शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

मोदीबाबा म्हणजे डेंग्यूचा मोठा डास, प्रणिती शिंदेंची वादग्रस्त टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 18:08 IST

आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरातील एका कार्यक्रमात बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि

मुंबई - माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आणि काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना सीमा ओलांडली. आपल्या देशात मोदीबाबा डेंग्यूचा सर्वात मोठा डास आला आहे, ज्यामुळे आजार होतोय. त्या डासाचं नाव मोदीबाबा आहे. आता, फवारणी करुन या डासाला पुढच्या वर्षी हाकलून लावायचं आहे, अशा शब्दात प्रणिती शिंदेंनी मोदींवर टीका केली. 

आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरातील एका कार्यक्रमात बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावरही नाव न घेता टीका केली. तसेच खासदार शरद बनसोडे यांच्यावर टीका करताना, बेवडा खासदार असा उल्लेख केला. काँग्रेस सरकारने केलेल्या कामाची उद्घाटनं भाजपाचे नेते करत आहेत. जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांना केवळ एकमेकांशी भांडण आणि आपापले गटतट सांभाळणं एवढच काम असल्याचा घाणघातही प्रणिती यांनी केला. 

प्रणिती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. मोदींना ना बहिण आहे ना बायको, आई आहे तिलाही फोटोसाठी ते रांगेत उभे करतात. स्वत: जग फिरतात, पण कंधी शेतकऱ्यांमध्ये येऊन त्यांची परिस्थिती पाहात नाहीत. मोदींना खोटं बोलायचीही सवय आहे. 15 लाख रुपयांचं काय झालं ? असा प्रश्नही प्रणिती यांनी उपस्थित केला. तसेच खोटं बोलण्याची सवय लागली आहे. 15 लाख जमा करुन देतो असं म्हणाले होते, कुठे गेले ते पैसे. नोटाबंदीमुळे सर्वसामन्यांना फटका बसला. मोदींना ना बहिण आहे, बायको आहे ना मुलगी…त्यामुळे त्यांना महिलांना होणाऱ्या त्रासाबद्दल कळणार नाही. आई आहे पण नोटाबंदीवेळी तिला रांगेत उभं केलं ते पण फोटोसाठी. जग फिरतात पण कधी शेतकऱ्यांमध्ये येऊन त्यांची परिस्थिती पाहत नाही’, असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं. तसेम मोदीबाबा हे डेंग्यूचा मोठा डास आहेत. यामुळे आजार होऊ शकतो, त्यामुळे पुढच्या वर्षी फवारणी करुन हा पळवून लावायचा आहे, अशी वादग्रस्त टीका प्रणिती यांनी केली आहे.  

टॅग्स :Praniti Shindeप्रणिती शिंदेSharad Bansodeशरद बनसोडेNarendra Modiनरेंद्र मोदी