सोलापूर विद्यापीठाचा नामविस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 01:43 IST2018-05-20T01:43:23+5:302018-05-20T01:43:23+5:30

मंत्रालयात शनिवारी शिवा संघटनेच्या वतीने वीरशैव लिंगायत समाजाचे प्रतिनिधी आणि धनगर समाजाचे प्रतिनिधीसमवेत समाजाच्या मागण्यांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Name of Solapur University Extension | सोलापूर विद्यापीठाचा नामविस्तार

सोलापूर विद्यापीठाचा नामविस्तार

मुंबई : सोलापूर विद्यापीठाचा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३१ मे २०१८ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात नामविस्तार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
मंत्रालयात शनिवारी शिवा संघटनेच्या वतीने वीरशैव लिंगायत समाजाचे प्रतिनिधी आणि धनगर समाजाचे प्रतिनिधीसमवेत समाजाच्या मागण्यांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे बोलत होते. सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार उपसमिती स्थापन करण्यात आली होती. त्यानुसार, सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्ताराचा निर्णय घेतला असून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ’ असा नामविस्तार केल्याचे तावडे यांनी सांगितले.

Web Title: Name of Solapur University Extension