आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचा सोलापुरात मूकमोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 12:13 IST2018-12-15T12:10:59+5:302018-12-15T12:13:43+5:30

सोलापूर : मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी एमआयएम पक्षाच्यावतीने सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चाला ...

Muslim community to decide on reservation for Solapur | आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचा सोलापुरात मूकमोर्चा

आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचा सोलापुरात मूकमोर्चा

ठळक मुद्दे- जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा- जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन- शहर व जिल्ह्यातील मुस्लिम बांधव हजारोंच्या संख्येत सहभागी

सोलापूर : मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी एमआयएम पक्षाच्यावतीने सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चाला पार्क चौकातून सुरूवात झाली़ पार्क चौकातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला़ त्यानंतर या मोर्चाचे रूपांतर धरणे आंदोलनात झाले.

या मोर्चात शहराबरोबरच ग्रामीण भागातूनही मुस्लीम बांधव, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते़ काँग्रेस आघाडी सरकारने गेल्या निवडणुकीच्या काळात राजकारणासाठी मुस्लीम समाजाला आरक्षण जाहीर केले़ पण उच्च न्यायालयात ते टिकले नाही. शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणा मान्य करूनच समाजाला १० टक्के आरक्षण मिळावे. लोकसंख्येच्या तुलनेत ते गरजेचे आहे, असे मत एमआयएम पक्षाचे तौफिक शेख यांनी मांडले़ यावेळी प्रामुख्याने शेख समिउल्लाह, रियाज खरादी, गाजी जहागीरदार, नसीम खलिफा आदी उपस्थित होते़.

सविस्तर वृत्त थोडक्याच वेळात...


 

Web Title: Muslim community to decide on reservation for Solapur