सोलापुरात अडीचशे रुपयांच्या हप्त्यासाठी तरुणावर खुनी हल्ला

By दिपक दुपारगुडे | Updated: May 21, 2024 18:59 IST2024-05-21T18:59:01+5:302024-05-21T18:59:44+5:30

फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी प्रवीण शेशगिरी याचा गेंट्याल चौकात चायनीजचा गाडा आहे.

Murderous attack on young man for installment of two hundred and fifty rupees in Solapur | सोलापुरात अडीचशे रुपयांच्या हप्त्यासाठी तरुणावर खुनी हल्ला

सोलापुरात अडीचशे रुपयांच्या हप्त्यासाठी तरुणावर खुनी हल्ला

सोलापूर : चायनीज गाडा सुरु ठेवण्यासाठी २५० रुपयांचा हप्ता का देत नाही या कारणावरुन आठ जणांच्या जमावाने एका तरुणावर पाठिवर चाकूने तर डोक्यात कोयत्यानं वार करुन खुनी हल्ला करण्याचा प्रकार पूर्व भागातील गेंट्याल चौक येथे घडला. प्रवीण चंद्रकांत शेशगिरी (वय- २६, रा. पाटील नगर, एमआयडीसी रोड, सलापूर) असे जखमीचे नाव आहे. सदर बझार पोलीस ठाण्यात आकाश मुदगल, हब्बू बंदपट्टे, आर. के. सुनील, शेरा, सागरसह अन्य आठजणांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी प्रवीण शेशगिरी याचा गेंट्याल चौकात चायनीजचा गाडा आहे. येथे व्यवसाय करण्यासाठी नमूद आरोपींनी सोमवारी रात्री उशिरा येऊन २५० रुपयांचा हप्ता मागितला. त्यास फिर्यादीने नकार दिल्याने चिडन अगोदार लाथाबुक्क्याने मारहाण केली. फिर्याद पळून जाताना नमूद आरोपीतील एकानं पाठित चाकूनं वार केला. दुसऱ्यानं कोयत्यानं डोक्यावर वार करुन जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या प्रकरणी अधिक तपास फौजदार बनकर करीत आहेत.

Web Title: Murderous attack on young man for installment of two hundred and fifty rupees in Solapur