पंढरपुरात महिलेसह बालकाचा खून; भीमा नदीपात्रातील इस्कॉन घाटाजवळील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2022 15:46 IST2022-05-08T15:46:20+5:302022-05-08T15:46:43+5:30
भीमा नदीपात्रातील इस्कॉन घाटाजवळ महिलेसह बालकाचा आढळला मृतदेह

पंढरपुरात महिलेसह बालकाचा खून; भीमा नदीपात्रातील इस्कॉन घाटाजवळील घटना
पंढरपूर : तालुक्यात शेगाव दुमाला हद्दीत भीमा नदीपात्रालगत इस्कॉन घाट ते गुजर घाटाच्या परिसरात एका ३५ वर्षीय महिलेचा आणि एका १० वर्षीय लहान मुलाचा मृतदेह संशयितरित्या आढळून आला.
शुक्रवारी सकाळी सात वाजता दोघांचे मृतदेह आढळून आले. याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील आणि त्यांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. मृत व्यक्तीचे नाव व पत्ता ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यासह इतर पोलीस ठाण्यात महिला व मुलगा हरवल्याबाबतच्या तक्रारींचे रजिस्टर पाहण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे.
----
महिलेच्या अंगावर जुने व्रण
मृत महिलेच्या गळ्यावर, छातीवर आणि दोन्ही हातावर तसेच इतरत्र भाजलेले जखमेचे जुने व्रण आहेत. मृत मुलाच्या उजव्या गालावर, कानाजवळ व गळ्यावर जखमेचे व्रण आहेत. चेहरा व छाती लालसर झाली आहे. या दोन व्यक्तींनी आत्महत्या केली की त्यांचा खून करण्यात आला असा प्रश्न पोलिसांपुढे निर्माण झाला आहे. दोन्ही अंगाने तपास सुरू केल्याचे पाेलिसांनी सांगितले.