ऊसदरासाठी मनसेचे सोलापूरात मुंडन आंदोलन, शेतकरी संघटना आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 12:03 IST2017-11-18T12:01:22+5:302017-11-18T12:03:59+5:30
ऊसदरासाठी मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलने सुरू आहेत़ शनिवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेच्या संतप्त शेतकºयांनी मुंडन करून आंदोलन केले़

ऊसदरासाठी मनसेचे सोलापूरात मुंडन आंदोलन, शेतकरी संघटना आक्रमक
ठळक मुद्देसाखर कारखानदारांनी पहिली उचल २७०० रूपये द्यावी अशी प्रमुख मागणीसहकार मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीसोलापूर जिल्ह्यात शेतकरी संघटना आक्रमक
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १९ : ऊसदरासाठी मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलने सुरू आहेत़ शनिवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेच्या संतप्त शेतकºयांनी मुंडन करून आंदोलन केले़ यावेळी सहकार मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़
साखर कारखानदारांनी पहिली उचल २७०० रूपये द्यावी अशी प्रमुख मागणी घेऊन शेतकरी संघटना आक्रमक आहेत़ या आंदोलनावेळी मनसेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते़