शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

मुंबईतील मुलाची धडपड ठरली असफल; व्हॉट्सअ‍ॅपवरच घेतले आईचे अंत्यदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 09:10 IST

संचारबंदीतील अडसर; निंगदळीत वृद्धेच्या निधनानंतर मुंबईतील मुलाची धडपड ठरली असफल

ठळक मुद्देमहांतेश यांना पहाटे ५ वाजता ही आईचे निधन झाल्याचा निरोप मिळालासकाळी ६ वाजता डोंबिवलीतील टिळकनगर पोलीस ठाणे गाठलेपत्नी आणि दोन मुलांसह व्हॉट्सअ‍ॅपवरून आईचे अंत्यदर्शन घेतले

शिवानंद फुलारी

अक्कलकोट : तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले...मुलगा मोठा झाला़़़मुंबईत नोकरी करु लागला..आजारातून उठता-उठता तिने मृत्यूनंतर मुखाग्नी द्यायचाल येण्याची अपेक्षा व्यक्त केली..अखेर तिने जगाचा निरोप घेतला आणि कोरोनामुळे लागलेल्या संचारबंदीचा अडसर मुलाला सोडवता आला नाही़़़पोलिसांकडे केलेले सारे पर्यंत असफल ठरले...अखेर व्हॉट्सअ‍ॅपवरच आईचे दर्शन घेतले. 

हा दुर्देवी प्रकार मुंबईतील महांतेश सगमुळे यांच्या वाटेला आला़ ते मुळचे निंगदळी(ता़ आळंद, कर्नाटक)चे़ अलिकडे त्यांनी अक्कलकोटमध्ये घर केले़ परंतू नोकरीसाठी त्यांना मुंबई गाठावी लागली़  कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत मुंबईत डोंबिवलीत महांतेश सगुमळे (वय ३८) कुटुंबासह राहतात. ते खासगी कंपनीत काम करतात़ त्यांच्या ८० वर्षीय आई मोहनबाई तेथेच राहत होत्या. गेल्या महिन्यात गंभीर आजारी पडल्यानंतर त्यांना महांतेश यांनी मुंबईत आणून उपचार केले होते. आईच्या ईच्छेनुसार गावी आणून सोडले होते़ मृत्यूपूर्वी आईने अंत्यविधी दरम्यान तूच अग्नी दे, अशी शेवटची  इच्छा महांतेशकडे व्यक्त केली होती.

त्यानंतर देशभरात कोरोना संकटामुळे लॉकडाऊन लादले. काही दिवसांतच आईची प्रकृती खालावली. लॉकडाऊन संपल्यानंतर गावी जाऊन आईची विचारपूरस करू, असा विचार महांतेशच्या मनात आला होता. परंतू प्रकृती झपाट्याने खालावत गेली. अखेर मोहनबाई यांनी आपल्या लाडक्या मुलाची वाट बघत १३ एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान मुलगा गावापर्यंत पोहोचू शकला नाही़ तलाठ्याच्या सूचनेनंतर मोहनबाईंच्या मृतदेहाला अग्नी देण्यात आला. आई जगाचा निरोप घेऊन देवाघरी गेली आणि आईची शेवटची इच्छा पूर्ण करता आली नाही याची सल मनात कायम राहिली.

पोलीस ठाण्यांची पायपीट ठरली व्यर्थ - महांतेश यांना पहाटे ५ वाजता ही आईचे निधन झाल्याचा निरोप मिळाला त्यांनी सकाळी ६ वाजता डोंबिवलीतील टिळकनगर पोलीस ठाणे गाठले. आईच्या अंत्यसंस्कारासाठी अक्कलकोटला जायचे असल्याच सांगितले. परंतू पोलिसांनी त्यांना पत्र देण्यास नकार दिले. स्वत:च्या जबाबदारीवर गावाला जाण्याचा सल्ला दिला. त्यांनी गावी जाण्याची तयारी केली. रस्त्यात कुणी हटकले आणि पत्नी व मुलांना क्वारंटाईन केले तर? प्रवासात पेट्रोल नाही मिळाले तर? असे अनेक प्रश्न त्यांना सतावू लागले. त्यांनी पुन्हा पोलीस ठाणे गाठून पेट्रोलसाठी पत्राची विनंती केली. तेही मिळाले नाही. त्यास कल्याणमधील (परिमंडळ ३) कार्यालयात जाण्यास सांगितले. महांतेश धावतपळत सर्व कागदपत्रे घेऊन तेथे पोहोचले. परंतू वरिष्ठ पोलीस अधिकारी बैठकीत असल्याने त्यांना बसण्यास सांगण्यात आले. महांतेश हे दीड तास ताटकळत राहिले़ बैठक उशिरापर्यंत चालली. तोपर्यंत सकाळचे १० वाजून गेले. सध्या कोरोना व्हायरस असल्यामुळे मृतदेह अधिक काळ ठेवता येत नाही. म्हणून तलाठ्याने दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यास सांगितले. अखेरीस महांतेश निराश होऊन घर गाठले. पत्नी आणि दोन मुलांसह व्हॉट्सअ‍ॅपवरून आईचे अंत्यदर्शन घेतले.

 खूप प्रयत्न करुनही पोलिसांचे सहकार्य मिळू शकले नाही़  धडपड वाया गेली. कोरोना मुळे मला आईच्या अंत्यसंस्कारासाठी परवानगी मिळाली नाही. यामुळे गावी जाता आले नाही.  मुंबई येथे उपचार करून सेवा केल्याची समाधान घेत आहे. तिच्या विचारावर आचरण करत राहू़ - महांतेश सगुमळे 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप