भांडण सोडविण्यासाठी आलेल्या सासूला तलवारीने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:48 IST2020-12-05T04:48:27+5:302020-12-05T04:48:27+5:30

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास आरोपी विजय हा दारूच्या नशेत फिर्यादी सोनाली यांना मारहाण ...

The mother-in-law who came to settle the quarrel was beaten with a sword | भांडण सोडविण्यासाठी आलेल्या सासूला तलवारीने मारहाण

भांडण सोडविण्यासाठी आलेल्या सासूला तलवारीने मारहाण

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास आरोपी विजय हा दारूच्या नशेत फिर्यादी सोनाली यांना मारहाण करत होता. यामुळे सोनाली यांनी आपल्या आई व मामांना याबाबतची माहिती फोनवरून देत आपल्या घरी बोलावले. ते घरी आल्यानंतर त्यांनी विजय याला जाब विचारला. तेव्हा त्याने ‘तुम्ही आमच्या घरी का आलात?’ असे विचारत मामांना मारहाण केली. घरातील तलवार घेऊन तो सोनालीच्या मामांना मारण्यासाठी पुढे आला. सासूबाईंनी तलवारीचा वार हातावर घेतल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. यामुळे सोनाली यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Web Title: The mother-in-law who came to settle the quarrel was beaten with a sword