मोटर सायकलच्या अपघातामध्ये आईचा मृत्यू; मुलाने वडिलाविरुद्ध पोलिसात दिली फिर्याद
By संताजी शिंदे | Updated: October 22, 2023 19:03 IST2023-10-22T19:02:52+5:302023-10-22T19:03:10+5:30
मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून वडिलांविरोधात पेालिसात गुन्हा दाखल

मोटर सायकलच्या अपघातामध्ये आईचा मृत्यू; मुलाने वडिलाविरुद्ध पोलिसात दिली फिर्याद
सोलापूर: कासेगाव ते वडजी बोरामणी जाणाऱ्या रोडवर पती-पत्नीच्या मोटारसायकलचा अपघात झाला. अपघातामध्ये दोघे जखमी झाले त्यात, पत्नीचा मृत्यू झाला. त्यामुळे मुलाने दिलेल्या फिर्यादीमध्ये वडीलांविरुद्ध रविवारी सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
प्रतिभा मोहन ढेकळे (वय ४५, रा. कासेगांव, ता. द. सोलापूर) असे मयत महिलेचे नाव आहे. दरम्यान, मुलगा शुभम मोहन ढेकळे (वय २२, रा. कासेगाव, ता.द. सोलापूर) याने दिलेल्या फिर्यादीवरून वडिल मोहन दत्तात्रेय ढेकळे (वय ४५, रा. कासेगांव, ता. द. सोलापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पाेलिसांनी दिलेली माहिती अशी की, दोघे मोटारसायकल (क्र. एमएच-१३ ईबी- ६९४६) वरून जात होते.
कासेगाव ते वडजी बोरामणी जाणाऱ्या रोड वरील जंजाळ तलावा जवळ संभाजी गाजरे यांच्या शेताजवळून जाणाऱ्या रोडवर अपघात झाला. या अपघातात प्रतिभा मोहन ढेकळे याच्या डोक्यास जबर मार लागला होता. उपचारा दरम्यान प्रतिभा ढेकळे याचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल लोखंडे हे करीत आहेत.