शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

मोहोळजवळ दुहेरी अपघात, तिघे जागीच ठार, पिकअपने टँकरसह मोटारसायकलस्वारास उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 6:15 PM

उभ्या असलेल्या टँकरला जोराची धडक देऊन पुन्हा मोटारसायकलला धडक दिली़ या दुहेरी अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १७ डिसेंबर रोजी पहाटे एकच्या सुमारास मोहोळजवळील हिवरेपाटीजवळ घडली़

ठळक मुद्देसोलापूर ते टेंभूर्णीकडे जाणाºया चौपदरीकरणाच्या दुरुस्तीचे काम सुरूवडवळ ते मोहोळ या पहिल्या टप्यात मागील दोन महिन्यात आठ जणांचे प्राण गेलेमोहोळ ते यावली या मार्गाचे काम सुरू असतानाच पाहिले तीन बळी गेले

आॅनलाइन लोकमत सोलापूरमोहोळ दि १८  : उभ्या असलेल्या टँकरला जोराची धडक देऊन पुन्हा मोटारसायकलला धडक दिली़ या दुहेरी अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १७ डिसेंबर रोजी पहाटे एकच्या सुमारास मोहोळजवळील हिवरेपाटीजवळ घडली़याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोडनिंबकडून मोहोळकडे येणाºया एम.एच. १३ ए. एम.८४६८ या पिकअप चा चालक विठ्ठल विश्वनाथ बंडगार (वय ३७ रा. बाळे) याने बेजबाबदारपणे वाहन चालविल्याने यावली गावाजवळ उभ्या असलेल्या टँकर क्र. एमएच १६ ए वाय ७७८१  या गाडीची डिझेल टाकी लिकेज झाल्याने ती दुरूस्त करण्यासाठी टाकीजवळ उभे असलेले मनोजकुमार यादव (वय ३०), राजकुमार यादव (वय २५ दोघे रा. जैनपूर उत्तर प्रदेश ) या दोघांना उडवून समोरून येणाºया मोटारसायकल क्र. एमएच१३ ए ,डब्लू ५८८१ वरील युवक गणेश दत्तु आखाडे (वय २५ रा. हिवरे ता. मोहोळ ) या तिघांना जोराची धडक दिल्याने हे तिघेही अपघातात ठार झाले. याबाबतची खबर स्वत: जीप चालक विठ्ठल बंडगर यांनी दिली असुन हयगयीने वाहन चालवून तीघांच्या मृत्यूला  जबाबदार असणाºया पिकअप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला़ याबाबतचा अधिक तपास पोहेकॉ अविनाश शिंदे हे करीत आहेत़------------सोलापूर ते टेंभूर्णीकडे जाणाºया चौपदरीकरणाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे़ त्यामुळे एकाच बाजूने वाहतुक सुरू आहे़ या कामाच्या वडवळ ते मोहोळ या पहिल्या टप्यात मागील दोन महिन्यात आठ जणांचे प्राण गेले आहेत तर दुसºया टप्यात मोहोळ ते यावली या मार्गाचे काम सुरू असतानाच पाहिले तीन बळी गेले आहेत़ यामुळे वाहनचालकांमधे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघात