शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

'मोदींनी शाळा सोडल्याचा दाखला दाखवावा', प्रकाश आंबेडकरांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 12:12 IST

प्रकाश आंबडेकर यांनी माढा येथील वंबआचे उमेदवार विजय मोरे यांच्या प्रचारार्थ अकलूज येथे आयोजित सभेत आंबेडकर यांनी मोदींवर प्रहार केला.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागासवर्गीयांना काय दिलं?. मोदी हे 15 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते, तर 5 वर्षे देशाचे पंतप्रधान होते. मात्र, मागासवर्गींयांना काय मिळाल? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे. तसेच मोदींना शाळा सोडल्याचा दाखला प्रसिद्ध करावा, असे आवाहनही आंबेडकर यांनी केले आहे. मोदींनी माढ्यातील सभेत ओबीसी असल्याचं म्हटलं होतं, त्यावरुन प्रकाश आंबेडकरांनी दाखल दाखविण्याचं चॅलेंज दिलं आहे.  

प्रकाश आंबडेकर यांनी माढा येथील वंबआचे उमेदवार विजय मोरे यांच्या प्रचारार्थ अकलूज येथे आयोजित सभेत आंबेडकर यांनी मोदींवर प्रहार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माढ्यातील सभेत बोलताना, मी मागासवर्गीय असल्यामुळेच काँग्रेसने मला जातीवाचक शिव्या दिल्याचं मोदींनी म्हटलं होतं. पण, आता काँग्रेस मागासवर्गीयांना चोर म्हणत असून मी ते सहन करणार नाही, असे म्हणत माढ्यातील सभेत मोदींनी ओबीसी कार्ड वापरले होते. तसेच, येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला होता. दरम्यान, माढा लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी आणि भाजपाने प्रतिष्ठेची केली आहे. या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतली, तर मुख्यमंत्रीही दौरे करत आहेत. तसेच, राष्ट्रवादीच्या शरद पवारांनीही येथे एका दिवसात तीन सभा घेण्याचं नियोजन केलंय. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या लढाईत आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचाही उमेदवार प्रतिष्ठेचा बनला आहे. त्यामुळेच, प्रकाश आंबेडकर यांनीही या मतदारसंघात लक्ष घातले आहे.     

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीNarendra Modiनरेंद्र मोदीmadha-pcमाढाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक