मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी; पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास

By दिपक दुपारगुडे | Updated: January 19, 2024 12:13 IST2024-01-19T12:12:15+5:302024-01-19T12:13:27+5:30

पुढे बोलताना ते म्हणाले की, तुमच्या घराची चावी देण्यासाठी मी स्वतः आलो आहे. आज मोदींनी एक गॅरंटी पूर्ण केली.

modi guarantee means a guarantee that the guarantee will be fulfilled said pm modi in solapur visit | मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी; पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास

मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी; पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास

दीपक दुपारगुडे, सोलापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुंभारी येथील रे नगर येथील १५ हजार  घरांचे हस्तांतरण असंघटित कामगारांना करण्यात आले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर सभास्थळी उपस्थित असलेल्या सोलापुरकरांना करताना पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत केली. २२ जानेवारीला ऐतिहासिक क्षण येणार आहे. आपले भगवान राम आपल्या मंदिरात विराजमान होतील. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं मी ११ दिवस साधना करणार आहे. तुमच्या आशिर्वादानं मी तिकडे जाणार आहे. यादिवशी  सर्वजण आपल्या घरात राम ज्योती प्रजवलीत करणार की नाही, आम्ही जो संकल्प केला होता तो आज पूर्ण होतोय. देशातील सर्वात मोठ्या सोसायटीचे लोकापर्ण झालं.", असं मोदी म्हणाले.

तर मला पण लहानपणी अशा घरात रहायला मिळालं हवं होतं, असं म्हणत मोदींना अश्रू अनावर झाले आणि ते भावूक झाले. मोदींनी क्षणभर भाषण थांबवलं आणि आवंढा गिळला. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाषण सुरू केलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, "तुमच्या घराची चावी देण्यासाठी मी स्वतः आलो आहे. आज मोदींनी एक गॅरंटी पूर्ण केली.

Web Title: modi guarantee means a guarantee that the guarantee will be fulfilled said pm modi in solapur visit