शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

लॉकडाऊनकाळात औषधं चुकली; मनोरूग्णांची रांग 'ओपीडी'त वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 13:17 IST

मनोरुग्णांच्या समस्येत वाढ; सिव्हिलच्या ओपीडीमध्ये रोज १०० जणांची तपासणी अनेकांची औषधे चुकली

सोलापूर : लॉकडाऊनमध्ये अन्य आजारांच्या रुग्णांचे खूपच मोठ्या प्रमाणात हाल झाले, त्यात मनोरुग्णांना कोरोनाचा मोठा फटका बसला. गेल्या काही महिन्यांत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात जाता न आल्याने व औषधे चुकल्याने त्यांच्या समस्यांत वाढ झाली आहे. देशामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर रुग्णालयात मर्यादित सेवा देण्यात येत होत्या. त्यामुळे ह्रदय विकार, मधुमेह सारख्या आजारांसोबतच मानसिक आजारांचा सामना करणाऱ्या रुग्णांनाही त्रास सहन करावा लागला. अनेकांना सिव्हिल हॉस्पीटलमधील मानसिक आरोग्याच्या ओपीडीध्ये जाता आले नाही. काहींंनी बाहेरुन ओषधे मिळविली तर काहींना तेही घेणे शक्य झाले नाही. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर इतर आजाराच्या रुग्णांना सेवा देणे सुरु झाले आहे. मात्र, या दरम्यान अनेक रुग्णांच्या समस्येत वाढ झाल्याचे दिसत आहे.रुग्णांमध्ये कोणता त्रास वाढलामधुमेह, ह्रदय विकार सारख्या रुग्णांना नियमितपणे औषधे घ्यावी लागतात. त्याचप्रमाणे काही मानसिक आजारामध्ये नियमितपणे औषधे घ्यावी लागतात. लॉकडाऊनमध्ये औषधे घेता न आल्याने आता मानसिक रुग्णामध्ये बडबड करणे, झोप न लागणे, साध्या गोष्टींवर राग येणे, घरच्यांना त्रास देणे, आदी लक्षणे वाढल्याचे दिसत आहे.सिव्हिलच्या ओपाडीमध्ये तपासण्यासाठी येणाऱ्या मानसिक आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. या रुग्णांमध्ये समस्यादेखिल वाढल्या आहेत. या रुग्णांना उत्कृष्ट सेवा देत आहोत. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर रुग्णांचे नातेवाईक नियमितपणे रुग्णाला घेऊन सिव्हिलमध्ये येत आहे. ही चांगला बाब आहे.- डॉ. कुंदन कांबळे, मानसोपचार तज्ञ, शासकिय रुग्णालयपुनर्तपासणीसाठी बोलविण्याच्या कालावधीत वाढजानेवारी 2020 मध्ये रुग्णाला दर 15 दिवसात एकदा तपासणीसाठी बोलविण्यात येत होते. त्यावेळी रोज 100 रुग्णांची तपासणी व्हायची. आता रुग्ण संख्या दुपटीने वाढली आहे. म्हणून सिव्हिलमध्ये रुग्णाला दर महिण्यानंतर तपासणीसाठी बोलविण्यात येत आहे. तरी देखिल जानेवारी 2021 मध्ये रोज 100 रुग्णांची तपासणी होत आहे. जानेवारी 2020 मध्ये अॅडमीट होणारे 15 रुग्ण अॅडमीट होते. आता कोरोना असल्याने जास्त रुग्णांना अॅडमीट केले जात नाही. त्यामुळे जानेवारी 2021 मध्ये अॅडमीट होणारे सहा रुग्ण होते.

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या