सोलापुरात वाईट हेतूनं अल्पवयीन मुलीचा हात पकडून मारहाण
By रवींद्र देशमुख | Updated: January 9, 2024 19:34 IST2024-01-09T19:33:37+5:302024-01-09T19:34:02+5:30
या प्रकरणी मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.

सोलापुरात वाईट हेतूनं अल्पवयीन मुलीचा हात पकडून मारहाण
सोलापूर: वाईट हेतूनं १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा हात पकडून विरोध करताना मारहाण करण्याची धक्कादायक घटना शहरातील एका परिसरात घडली. प्रसंगावधान राखून या मुलीनं आरडाओरडा केल्याने पुढे होणारा अनर्थ टळला. या प्रकरणी मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. शमशोद्दीन नदाफ असे या आरोपीचे नाव आहे.
यातील अल्पवयीन मुलगी शहरातील एका परिसरात राहते. सोमवारी रात्री १० ते ११ च्या दरम्यान घराकडे जात असताना वाटेत आरोपीने तिला अडवून ‘तू मला खूप आवडतेस, नवीन बांधकामाकडे चल’ असे म्हणाला असता पिडितेने त्यास नकार दिला. चिडलेल्या आरोपीने तिचा हात पकडून मारहाण केली. आरडाओरडा करीत असताना तोंड दाबले.
दरम्यान तिने कशीबशीे सुटका करुन घेतली. संबंधीत प्रकाराची नातलगांना कल्पना देऊन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली. या प्रकरणी विनयभंग व बाललैंगिक छळाचा गुन्हा नोंदला असून, महिला सहा. पोलीस निरीक्षक कडू करीत आहेत.