शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी उजनीच्या पायथ्याशी लाखो मासे मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 12:38 IST

भीमा नदी पडली कोरडी; पाणीटंचाईमुळे पिकेही वाळून चालल्याने शेतकºयांमध्ये चिंता

ठळक मुद्देदुष्काळाची दाहकता आता वाढत चाललेली दिसायला लागलीकधी नव्हे ते उजनी धरणाच्या पायथ्याशी असणाºया भीमा नदीचे पात्र कोरडेकाही दिवसांपूर्वीही उजनीतून पाणी सोडावे अशी मागणी करत शेतकºयांनी आंदोलन केले

भीमानगर : दुष्काळाची दाहकता आता वाढत चाललेली दिसायला लागली आहे.  कधी नव्हे ते उजनी धरणाच्या पायथ्याशी असणाºया भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने या पात्रात असलेले असंख्य मासे मृत्युमुखी पडले आहेत. तर काही मासे हे पात्रातील छोट्याशा डबक्यांमध्ये अखेरच्या घटका मोजत आहेत.  

माढा तालुक्यातील रांझणी, आलेगाव बुद्रुक, परिसरातील उन्हाळ्याच्या तीव्रतेने भीमा नदीचे पात्र कोरडे ठाक झाल्याने येथील लक्षावधी मासे तडफडून मृत्युमुखी पडत आहेत. याच परिसरातील अवसरी, बाभूळगाव,  बेडसिंगे, भांडगाव या गावातील उभ्या पिकाचा प्रश्न निर्माण झाला आहे. उजनी धरणातून नदीपात्रात पाणी सोडून या जलचराना व पिकांना जीवदान द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे.

 काही दिवसांपूर्वीही उजनीतून पाणी सोडावे अशी मागणी करत शेतकºयांनी आंदोलन केले होते; मात्र याचा कसलाच परिणाम यंत्रणेवर झाला नाही. 

तीव्र उन्हामुळे नदीपात्रातील पाणी आटले आहे. लाखो जलचर चिखलात मृतावस्थेत विखुरले गेले आहेत. असंख्य चिखलात अखेरच्या घटका मोजत आहेत. या जलचरांच्या मरतुकीबरोबरच पिकेही वाळून चालल्याने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. उजनी धरणातून पाणी सोडून या दोन्ही घटकांना जीवदान द्यावे, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

ही भयावह वास्तवाची चाहूलच !- पात्रात मृतावस्थेत सड्यासारखे पडून असलेले मासे खाण्यासाठी या भागात पक्षांनीही गर्दी केली आहे. अल्पश्रमात असंख्य मासे सापडत असल्याने मासेमारही गर्दी करीत आहेत. हे दुष्काळाचे चित्र भयावह असून भविष्यात जनावरे आणि पिके पाण्याविना हळूहळू जळत जाणार हे भयंकर वास्तव आहे.  मागील कित्येक दिवसात अशी परिस्थिती प्रथमच पाहावयास मिळत असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगितले जात आहे. आगामी काळातील भयावह वास्तवाची ही चाहूलच आहे की काय, या भीतीने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणdroughtदुष्काळwater shortageपाणीटंचाईfishermanमच्छीमार