जागा विकत घेऊन घर बांधण्यासाठी दहा लाख मागत पत्नीचा मानसिक छळ

By दिपक दुपारगुडे | Updated: April 26, 2023 18:23 IST2023-04-26T18:23:38+5:302023-04-26T18:23:54+5:30

घर जागा विकत घेण्यासाठी व बांधकाम करण्यासाठी माहेरून दहा लाख रूपये घेऊन ये म्हणत पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चाैघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Mental torture of wife asking for 10 lakhs to buy a land and build a house | जागा विकत घेऊन घर बांधण्यासाठी दहा लाख मागत पत्नीचा मानसिक छळ

जागा विकत घेऊन घर बांधण्यासाठी दहा लाख मागत पत्नीचा मानसिक छळ

सोलापूर : घर जागा विकत घेण्यासाठी व बांधकाम करण्यासाठी माहेरून दहा लाख रूपये घेऊन ये म्हणत पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चाैघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत याप्रकरणी नेहा नियामत अली सय्यद (वय २३, रा. सध्या सरवदे नगर, हैदराबाद नाका) यांनी एमआयडीसी पोलिस ठाणे फिर्याद दिली आहे.

 फिर्यादी नेहा सय्यद यांचे आरोपी नियामत अली सय्यद याच्याशी २०१८ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर सासरकडील मंडळींनी संगनमत करून, तगादा लावत छळ केला. यात जागा घेण्यासाठी दहा लाख रूपये माहेरून आण, त्यानंतरच तू नांदायला ये म्हणत त्यांना त्रास दिला. शिवाय आरोपींनी चारित्र्यावर संशय घेत, शिवीगाळ करत मारहाण केली, अशा आशयाची फिर्याद सय्यद यांनी दिली आहे. ही घटना नोव्हेंबर २०१८ ते जुलै २०२२ दरम्यान लातूर येथे घडली. त्यांच्या फिर्यादीवरून पती नियामत अली सय्यद, सासरे अकबर अली सय्यद, मुमजात सय्यद व दीर सिपटन अकबरअली सय्यद (सर्व रा. लातूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
 

Web Title: Mental torture of wife asking for 10 lakhs to buy a land and build a house