मटका बुकीवर धाड पडल्यानंतर दुसºया मजल्यावरून उडी टाकलेल्या मटकेवाल्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 21:06 IST2020-08-24T19:23:38+5:302020-08-24T21:06:53+5:30
सोलापूर शहरातील न्यु पाच्छा पेठेतील घटना: सोलापूर शहर पोलिस घटनास्थळी दाखल

मटका बुकीवर धाड पडल्यानंतर दुसºया मजल्यावरून उडी टाकलेल्या मटकेवाल्याचा मृत्यू
सोलापूर : न्यु पच्चा पेठ येथील कोणती कोरवी गल्ली पोषमा मंदिराजवळील इमारतीमध्ये सुरू असलेल्या मटका बुकीवर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकली असता एका मटकावाल्याने दुसºया मजल्यावरून उडी मारली त्यात त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार सोमवारी दुपारी घडला.
पोषमा मंदिरजवळील दोन मजली इमारतीमध्ये मटक्याची बुकी सुरू होती. शहरातील लावण्यात आलेल्या मटक्याच्या चिठ्ठ्या आणि पैशाचे कलेक्शन याचे कामकाज या इमारतीमध्ये चालत होते. हा प्रकार गुन्हे शाखेच्या पोलिसांना समजल्यानंतर दुपारी अचानक धाड टाकली.
पोलीस आल्याचे समजतात आतमधील मटका बुकीवाल्यांची पळापळ सुरू झाली. पोलिसांना घाबरून एकाने दुसºया मजल्यावरून उडी टाकली. खाली पडल्याने तो गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तत्काळ जेलरोड पोलिस ठाणे व सदर बझार पोलीस ठाण्याच्या पोलिस कर्मचाºयांना घटनास्थळी बोलावून घेतले.