सोलापूरजवळच्या सीना नदीला महापूर; सोलापूर-विजापूर महामार्ग बंदच
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 10:11 IST2025-09-26T10:10:55+5:302025-09-26T10:11:49+5:30
मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले, ओढे, तलाव तुडुंब वाहत आहेत. या वाहत असलेल्या पाण्याने जिल्ह्यातील १२९ गावांना वेढा घातला आहे.

सोलापूरजवळच्या सीना नदीला महापूर; सोलापूर-विजापूर महामार्ग बंदच
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : सोलापूर शहरापासून अवघ्या काही अंतरावरून वाहणाऱ्या सीना नदीला महापूर आला आहे. या महापुराचे पाणी महामार्गावर पसरल्यामुळे सोलापूर विजयपूर रस्ता मागील तीन दिवसांपासून बंदच आहे. सध्या महामार्गावर चार ते पाच फूट पाणी साठल्याने पोलिसांनी महामार्ग बंदच ठेवला आहे.
मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले, ओढे, तलाव तुडुंब वाहत आहेत. या वाहत असलेल्या पाण्याने जिल्ह्यातील १२९ गावांना वेढा घातला आहे, हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. सोलापूर विजयपूर महामार्ग बंद असल्याने वाहनांच्या रांगा दहा किलोमीटर पर्यंत लांबच्या लांब लागले आहेत.