दिवाळीसाठी आलेल्या विवाहित महिलेचा ट्रकच्या धडकेत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 15:58 IST2019-11-01T15:47:15+5:302019-11-01T15:58:39+5:30
सोलापूर शहरातील गुरूनानक चौकातील घटना; शहर पोलीसांनी दिली घटनास्थळाला भेट

दिवाळीसाठी आलेल्या विवाहित महिलेचा ट्रकच्या धडकेत मृत्यू
सोलापूर : दिवाळीसाठी आलेल्या विवाहित महिलेचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास गुरूनानक चौकात घडली. शुभांगी बनकर (वय ३० रा. सोलापूर) असे मृत महिलेचे नाव आहे.
मयत शुभांगी ही आपल्या वडिलांसोबत दुचाकीवर बसून घराकडे जात असताना गुरूनानक चौकात विजयपूरहुन हैद्राबादकडे जाणाºया मालट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत विवाहित महिलेस जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी चालविणाºया वडिल गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती शहर पोलीसांनी दिली.
मयत विवाहित महिला ही पुणे येथील रहिवाशी असून दिवाळी सणासाठी आपल्या वडिलाकडे माहेरी आली होती. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी घटनास्थळाला भेट दिली.