मराठा समाजाचा आज सोलापुरात मोर्चा; कार्यकर्ते जमू लागले.. घोषणाबाजी सुरू झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 09:29 IST2021-07-04T09:26:34+5:302021-07-04T09:29:35+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Maratha community marches in Solapur today; Activists started gathering .. sloganeering started | मराठा समाजाचा आज सोलापुरात मोर्चा; कार्यकर्ते जमू लागले.. घोषणाबाजी सुरू झाली

मराठा समाजाचा आज सोलापुरात मोर्चा; कार्यकर्ते जमू लागले.. घोषणाबाजी सुरू झाली

सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज सोलापुरात मोर्चा निघणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच छत्रपती संभाजी महाराज चौकात मराठा समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी जमू लागले आहेत. राज्यसरकार च्या विरोधात घोषणाबाजी देण्यासही सुरुवात झाली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलिसांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. दरम्यान, परवानगी जरी नाकारली असली तरी मोर्चा काढणारच असा इशारा आयोजकांनी दिल्याने सोलापूर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. 


सोलापूर पोलिसांनी सोलापूर शहरात येणारे सर्व रस्ते, मार्ग वाहतुकीसाठी बंद केले आहेत, शिवाय जिल्ह्यातील विविध मार्गावर पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. 

Web Title: Maratha community marches in Solapur today; Activists started gathering .. sloganeering started