मनोहरमामाला सात दिवसांची पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 11:57 IST2021-09-21T11:55:22+5:302021-09-21T11:57:10+5:30
करमाळा पोलिसांनी भोसले यास बारामती पोलिसांकडून रविवारी दुपारी ताब्यात घेतले. त्यानंतर सोमवारी त्याला करमाळा न्यायालयात हजर करण्यात आले.

मनोहरमामाला सात दिवसांची पोलीस कोठडी
करमाळा (सोलापूर) : पीडित महिलेवर सामुदायिक अत्याचार व फसवणूक प्रकरणी उंदरगाव येथील मनोहर भोसलेला करमाळा न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
करमाळा पोलिसांनी भोसले यास बारामती पोलिसांकडून रविवारी दुपारी ताब्यात घेतले. त्यानंतर सोमवारी त्याला करमाळा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात तब्बल पाऊणतास युक्तिवाद चालला. मनोहर भोसलेवर बारामती व करमाळा पोलिसात गुरुवारी एकाच दिवशी दोन गुन्हे दाखल झाले होते. त्याला ताब्यात घेण्यासाठी बारामती व करमाळा पोलिसांचे पथक भोसलेच्या मागावर होते. बारामती पोलिसांनी सातारा जिल्ह्यातून त्याला ताब्यात घेऊन अटक केली.
मालिकेत काम देतो सांगून अत्याचार
मनोहर भोसले यास न्यायाधीश आर. ए. शिवरात्री यांच्यासमोर हजर केले. त्यांनी सात दिवसाची पोलीस कोठडी दिली. मालिकेत काम देतो असे सांगत अत्याचार केल्याचा भोसलेवर आरोप आहे. या गुन्ह्यातील तपासासाठी दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली.