नंग्या तलवारीने दहशत माजविल्याप्रकरणी पंढरपुरातील एकजण पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 19:22 IST2021-01-08T19:21:48+5:302021-01-08T19:22:29+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

नंग्या तलवारीने दहशत माजविल्याप्रकरणी पंढरपुरातील एकजण पोलिसांच्या ताब्यात
पंढरपूर : आढीव (ता. पंढरपूर) येथे नंग्या तलवार हातात घेऊन दहशत माजवल्या प्रकरणी सागर हिंदुराव पासले (वय ३०, रा. आढीव, ता. पंढरपूर) याला शुक्रवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आढीव (ता. पंढरपूर) येथील सागर पासले हा हातात तलवार घेवुन फिरत आहे. अशी माहिती पोनि किरण अवचर यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली. त्यांनी सपोफौ. अशोक जाधव, पो. ना. प्रकाश कोष्टी, नितीन माळी, श्रीराम ताटे हे एक पथक तयार केले. त्या पथकाला खाजगी वाहनाने आढीव गावात पाठवले.
यावेळी जिल्हा परिषद शाळेचे समोर रोडवर सागर हिंदुराव पासले हा एका हातात तलवार व दुसऱ्या हातात तलवारीचे कव्हर घेवुन उभा असलेला दिसला. त्यास गराडा घालुन जागीच पकडले. सागर हिंदुराव पासले यांच्या जवळ शस्त्र जवळ बाळगण्याचा परवाना नाही. तरीही तो लोखंडी तलवार बेकायदेशीर जवळ बाळगलेल्या परस्थितीत मिळुन आला आहे. यामुळे त्याच्या विरुध्द शास्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४,२५ सह महा पोलीस कायदा कलम १३५, प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपो फौ. अशोक जाधव करत आहेत.