मालट्रकला टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू
By Appasaheb.patil | Updated: February 29, 2020 09:54 IST2020-02-29T09:40:53+5:302020-02-29T09:54:03+5:30
सोलापूर - पुणे महामार्गावरील सावळेश्वर टोलनाक्याजवळील घटना

मालट्रकला टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू
ठळक मुद्देसोलापूर-पुणे महामार्गावर पहाटे घडली घटनाअपघातातील मयत लातूर जिल्ह्यातील बामणी गावातील असल्याची माहिती
सोलापूर : सोलापूर - पुणे हायवेवर सावळेश्वर टोल नाका येथे शनिवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास टोल भरण्यासाठी उभारलेल्या मालट्रकला भरधाव आलेल्या आयशरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात आयशरमधील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
प्रयागाबाई सुरवसे (वय ७५) आणि मारुती बलसुरे (क्लिनर) हे दोघे जागीच ठार झाले तर ड्रायव्हर सचिन जाधव गंभीर जखमी आहे. याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात घटनेची फिर्याद दाखल करण्यात येत आहे.