हत्तुरे वस्तीतील मल्लिकार्जुन नगर सील; कोरोना पेशंट आढळल्यामुळे एकच खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 13:23 IST2020-05-18T13:22:30+5:302020-05-18T13:23:02+5:30
महापालिका, पोलीसांची टीम दाखल; नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू

हत्तुरे वस्तीतील मल्लिकार्जुन नगर सील; कोरोना पेशंट आढळल्यामुळे एकच खळबळ
सोलापूर : सोलापूर विमानतळासमोरील हत्तुरे वस्ती येथील मल्लिकार्जुन नगर परिसरात कोरोना पेशंट आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून हा परिसर सील करण्यात आला आहे.
मल्लिकार्जुन परिसरात राहणारा साठ वर्षे इसम एका खाजगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. गेल्या सात- आठ दिवसापासून त्याला हृदयविकाराचा आणि दम्याचा त्रास होता. त्यामुळे तो दवाखान्यात ?डमिट झाला होता. रविवारी तो मयत झाल्याची माहिती समोर आली असून सोमवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
त्यामुळे पोलिसांनी हा परिसर सील केला आहे. दरम्यान महापालिका आणि अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात फवारणीचे काम सुरू करण्यात आले आहे.