शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅपिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
3
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
4
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
5
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
6
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
7
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
8
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
9
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
10
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
11
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
12
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
13
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
14
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
15
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
16
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
17
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
18
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
19
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
20
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 22:03 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अभिजीत पाटील यांनी एबी फॉर्म दिला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : गेल्या काही दिवसापासून माढा विधानसभा मतदारसंघाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारीसाठी अनेकांनी मागणी केली होती.आता माढा विधानसभा मतदारसंघात मोठी ट्विस्ट पाहायला मिळत आहे. माढा विधानसभा मतदारसंघात खासदार शरद पवार यांनी अभिजीत पाटील यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा एबी फॉर्म दिला आहे. 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर

माढा विधानसभा मतदारसंघात आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनीही उमेदवारीची मागणी केली होती, त्यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू होती. तर आमदार बबनदादा शिंदे यांच्या नावच्याही चर्चा सुरू होत्या. अखेर अभिजीत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.  लोकसभा निवडणुकीत अभिजीत पाटील यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता.

माढ्यात शरद पवारांनी धक्कातंत्र देत यावेळी अभिजीत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत अभिजीत पाटील यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. पण त्यांनी विधानसभेची उमेदवारी शरद पवार गटाकडे मागितली होती. 

आमदार बबनराव शिंदे यांनीही काही दिवसापासून उमेदवारीसाठी शरद पवार यांच्याकडे प्रयत्न केले होते. पण त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. आता बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे माढ्यातून अपक्ष निवडणूक लढणार असल्याची घोषणा आमदार बबनराव शिंदे यांनी केली होती.

मोहोळमध्ये रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी

मोहोळमध्ये अजितदादा गटाकडून आमदार यशवंत माने यांनी अर्ज दाखल केला. पवार गटाकडून राजू खरे, संजय क्षीरसागर यांचे नाव चर्चेत होते. 'मी उमेदवार देतो, तुम्ही कामाला लागा...' असे सांगत पवारांनी इच्छुकांनी मतदारसंघात पाठवून दिले होते. त्यामुळे शरद पवार नक्की कोणत्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याबाबत मतदारसंघात उत्सुकता होती. अखेर पवार यांनी याबाबतचा निर्णय घेत माजी आमदार रमेश कदम यांच्या मुलीला तिकीट देण्याचे निश्चित केले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सिद्धी कदम यांना तिकीट दिल्यानंतर आता पक्षातील इतर इच्छुक नक्की काय भूमिका घेतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४madha-acमाढाSolapurसोलापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार