शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 12:01 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सोलापुरात ऐन निवडणुकीदिवशीच काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा जाहीर केला.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभरात मतदान होत आहे. दरम्यान, ऐन निवडणुकीदिवशीच सोलापूर दक्षिण मतदारसंघात ठाकरे गटाला झटका बसला आहे. काँग्रेसचे नेते माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला आहे. काडादी यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे, यामुळे आता सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील लढत चुरशीची होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : "माझा मुलगा पुन्हा मुख्यमंत्री होणार"; एकनाथ शिंदेंच्या वडीलांनी व्यक्त केला विश्वास

आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला, यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. शिंदे यांनी सोलापूर दक्षिणचे अपक्ष उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिंदे म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून मी या मतदान केंद्रावर मतदान करतो. आता या मतदारसंघात धर्मराज काडादी उमेदवार आहेत.या मतदारसंघात चांगले वातावरण आहे. काडादी एक चांगले उमेदवार आहेत, त्यांना भविष्य आहे. या मतदारसंघात माने यांना उमेदवारी मिळाली होती पण त्यांना फॉर्म मिळालेला नाही त्यामुळे माने यांनीही काडादी यांना पाठिंबा दिला आहे. या मतदारसंघात शिवसेनेने जास्त गडबड केली. आम्ही या ठिकाणावरुन दोनवेळा निवडून आलो होतो. आम्ही आता त्यांना हे सगळ समजून सांगितले आहे. यामुळे आता काँग्रेसचा अधिकृत पाठिंबा धर्मराज काडादी यांनी असल्याचे सुशिलकुमार शिंदे यांनी सांगितले. 

यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, आज लोकशाहीचा सण आहे, तो साजरा केला पाहिजे. देशात लोकशाही टीकेल का हा प्रश्न निर्माण झाला आहे, पण जोपर्यंत देशात काँग्रेस आहे तोपर्यंत टीकणार. मागील निवडणुकीत तुम्ही विजय लोकशाहीचा झाला हे बघितले आहे. आता त्यांचे दिग्गज नेते पैसे वाटप करत असल्याचे दिसले आहे. त्यांना त्यांची हार दिसत आहे. यामुळे आता महाविकास आघाडीचा विजय झाला आहे हे निश्चित आहे, असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या. 

"सोलापूर दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, या मतदारसंघाने मुख्यमंत्री निवडून दिले आहेत. आम्ही आधी उमेदवार दिला होता, पण शेवटच्या क्षणी त्यांना ओबी फॉर्म दिला नाही. दिलीप माने यांनी अर्ज मागे घेतला. पण काही कारणामुळे इकडे फ्रेंडली  फाईट झाली नाही, संजय राऊत यांनी मायनर दुरुस्ती करणार असं सांगिलं होतं, पण झाले नाहीत. म्हणून आता आम्ही धर्मराज काडादी यांच्यासोबत आहे, असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Solapurसोलापूरcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक 2024