Vidhan Sabha 2019: शेततळ्याचे अनुदान कधी मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 05:26 AM2019-09-20T05:26:55+5:302019-09-20T05:27:18+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत शेततळी खोदून शेतकरी पस्तावले आहेत.

Maharashtra Vidhan Sabha 2019 - When will I get a farm grant? | Vidhan Sabha 2019: शेततळ्याचे अनुदान कधी मिळणार?

Vidhan Sabha 2019: शेततळ्याचे अनुदान कधी मिळणार?

Next

सोलापूर : ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत शेततळी खोदून शेतकरी पस्तावले आहेत. शेततळ्याचे अनुदानही मिळत नाही व पाऊस नसल्याने शेततळ्यात पाणीही येत नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात पूर्ण असलेल्या ६४० शेततळ्यांसाठी ३२० लाख रुपयाची मागणी कृषी कार्यालयाने केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकोपयोगी योजना म्हणून ‘मागेल त्याला शेततळे’ची योजना जाहीर केली होती. दरवर्षीच पावसाची हुलकावणी सुरू असल्याने शेततळ्यांची शेतकऱ्यांना गरजही निर्माण झाली आहे. उसासारख्या पिकाला पाण्याची अधिक आवश्यकता असल्याने व साखर कारखान्यांकडून दरही म्हणावा तसा मिळत नसल्याने शेतकरी फळबागा, ढोबळी मिरची व अन्य नगदी पिकांकडे वळला आहे. या पिकांसाठी शेततळ्यांचे पाणी पुरेसे होत असल्याने प्रत्येकाला शेततळे खोदावे असे वाटत आहे. मात्र त्यासाठी शासनाचे मिळणारे तुटपुंजे अनुदानही मिळेना झाले आहे. मागील दोन-तीन महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यासाठी अनुदान मिळाले नाही. तब्बल ६४० शेततळी खोदून पूर्ण झाली असून त्यासाठी तालुका स्तरावरुन ३२० लाख रुपयाची मागणी केली आहे. गरज म्हणून तसेच शासनाने जाहीर केल्यामुळे आॅनलाईन अर्ज करुन कृषी खात्याची रितसर मंजुरी घेवून खोदलेल्या शेततळ्यांचेही अनुदान मिळेना झाले आहे. मागील वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली होती. यामुळे शेततळ्यांची मागणी वाढली. याही वर्षी पाऊस म्हणावा तितका पडला नसल्याने शेततळी कोरडी पडली आहेत तर खोदलेल्या तळ्यांचे पैसेही मिळत नाहीत. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी धास्तावला आहे.
करमाळा तालुक्यात सर्वाधिक शेततळी
उत्तर सोलापूर-४१ शेततळी २०.५० लाख, दक्षिण सोलापूर- २३ शेततळी ११.५० लाख, मोहोळ-५६ शेततळी २८ लाख, अक्कलकोट- ३८ शेततळी १९ लाख,पंढरपूर-१३१ शेततळी ६५.५० लाख, सांगोला- ३४ शेततळी १७ लाख,मंगळवेढा १४ शेततळी ७ लाख,माळशिरस-१०७ शेततळी ५३.५० लाख, बार्शी- २२ शेततळी ११ लाख, माढा- १२१ शेततळी ६०.५० लाख, करमाळा- २९४ शेततळी १४०.८८ लाख रुपये.
>निधी मिळण्यासाठी पाठपुरावा
सुरू आहे. शासनाकडून अनुदान मिळणार आहे हे नक्की आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे पैसे मिळण्यास विलंब लागत आहे. येत्या आठवड्यात अनुदान येण्याची शक्यताआहे.
- बसवराज बिराजदार
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 - When will I get a farm grant?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.