Maharashtra Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? खासदार सुनेत्रा पवार यांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 23:35 IST2025-05-25T23:21:24+5:302025-05-25T23:35:09+5:30
Maharashtra Politics : मागील काही दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Maharashtra Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? खासदार सुनेत्रा पवार यांनी स्पष्टच सांगितलं
Maharashtra Politics ( Marathi News ) : मागील काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. काही कार्यक्रमात खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर दिसले. दरम्यान, आता दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चांवर खासदार सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
राजकारण आणि कुटुंब या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. दोन्ही पक्ष एकत्र येणार या फक्त चर्चा आहेत. जे काही होईल ते आपण बघालच असे म्हणत दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीकरणावर खासदार सुनेत्रा पवार यांनी हात जोडत अधिक बोलणे टाळले.
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
पंढरपूर जवळील वाखरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी खासदार सुनेत्रा पवार आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी लाडक्या बहिणीच्या वाढीव हप्ता बद्दल अजित पवार निर्णय घेतील ते जे बोलतात ते करतात आपल्याला माहित आहे. असे म्हणत अजित पवारांच्या शब्दाला जागण्याच्या स्वभावाचे कौतुक केले.
दरम्यान, यावेळी सुनेत्रा पवार यांनी पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. पवार म्हणाल्या, वैष्णवी हगवणे बाबत झालेल्या घटनांचे समर्थन करत नाही, अशा घटना व्हायला नको आहेत. पक्षाने याबाबत भूमिका मांडलेली आहे.