शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

महाराष्ट्र सरकारचा सहकाराकडे बघण्याचा दृष्टिकोन संशयास्पद, भाजप सरकार ढोगी - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:07 PM

भाजपा सरकार हे सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांची जन्मशताब्दी साजरी करतेय. यात सरकारचे मोठेपण नसून सहकार महर्र्षींचे मोठेपण आहे. आज सहकार संक्रमणावस्थेतून जात आहे.

ठळक मुद्देसहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील व रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या प्रतिमेचे अनावरणदीड महिन्यात साखरेचे दर ६०० रूपयाने पाडले साखर कारखानदारी व इतर अनेक सहकारी संस्था कशा अडचणीत

आॅनलाइन लोकमत सोलापूरअकलूज दि १८ : भाजपा सरकार हे सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांची जन्मशताब्दी साजरी करतेय. यात सरकारचे मोठेपण नसून सहकार महर्र्षींचे मोठेपण आहे. आज सहकार संक्रमणावस्थेतून जात आहे. कारण सहकाराकडे बघण्याचा भाजप सरकारचा दृष्टिकोन संशयास्पद असून हे सरकार ढोंगी असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील व रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या प्रतिमेचे अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी जलसंपदा मंत्री व राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा. विजयसिंंह मोहिते-पाटील, आ़ दत्तात्रय भरणे, आ़ दीपक चव्हाण, आ़ नारायण पाटील, आ़ बबनराव शिंंदे, आ़ हनुमंत डोळस, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील, माजी आ़ विनायकराव पाटील, धनाजी पाटील, माजी खा़ रणजितसिंंह मोहिते-पाटील, माजी जि. प. अध्यक्ष फत्तेसिंंह माने-पाटील, मदनसिंंह मोहिते-पाटील, राजूबापू पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील, सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, जि. प. सदस्या स्वरूपराणी मोहिते-पाटील, राष्टÑवादीच्या जिल्हाध्यक्षा मंदाताई काळे, तालुकाध्यक्षा फातिमा पाटावाला, रमेश बारसकर, उमेश पाटील, विक्रांत माने, प्रकाश चवरे उपस्थित होते. प्रारंभी स़ म़ साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंंह मोहिते-पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अजित पवार पुढे म्हणाले की, राज्याच्या समृध्दीला सहकाराच्या चळवळीने हातभार लावला, विकासाचा पाया रचला. ग्रामीण भागाला खºया अर्थाने विकासाची ओळख सहकार चळवळीनेच करून दिली. यामध्ये सर्वात मोलाचा वाटा असेल तर तो सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचा. आज भाजपा सरकार सहकाराच्या मुळावर उठले आहे. बाजार समिती, साखर कारखानदारी व इतर अनेक सहकारी संस्था कशा अडचणीत येऊन मोडीत निघतील, याकडे सरकार लक्ष पुरवते आहे. हे सरकार फसवे आहे. धनगर, मराठा व मुस्लीम समाजाला आरक्षण देतो म्हणून या सरकारने फसवले आहे. समित्या, चौकशा आणि अभ्यास या गोंडस नावाखाली सरकारने लोकांना उल्लू बनवले असल्याचे ते म्हणाले. सुनील तटकरे म्हणाले, निकष आणि तत्वत: या शब्दांचा घोळ घालून सरकारने शेतकºयांना कर्जमाफी प्रकरणात फसवले आहे. आयात आणि निर्यातीचे चुकीचे धोरण राबवून शेतकºयांचे खच्चीकरण केले आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांची जन्मशताब्दी जर सरकारला प्रामाणिकपणे साजरी करायची असेल तर त्यांनी शेतकºयांना फसवणे बंद केले पाहिजे. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाºया उजनीच्या पाणी वाटपाचा तिढा सोडवून शेतकºयांना पाणी टंचाईतून वाचवले पाहिजे. -------------------दीड महिन्यात साखरेचे दर ६०० रूपयाने पाडले- सरकारची साखर कारखानदारीबद्दलची धोरणे चुकीची आहेत. गतवर्षी सरकारने गरज नसताना ८ लाख मे. टन साखर आयात केली; मात्र देशातील साखर निर्यात करताना ते सवलत देत नाहीत. कारखाने सुरू होऊन दीड महिना झाला नाही. ३ हजार ७०० रूपयांवरची साखर आज ३ हजार १०० रूपयांवर येऊन ठेपली आहे. असेच जर चालू राहिले तर साखर कारखाने मोडीत निघतील, असे अजित पवार यांनी सांगितले़

टॅग्स :SolapurसोलापूरAjit Pawarअजित पवार