शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

माढ्यात रात्रीच राजकीय घडामोडींना वेग! धैर्यशील मोहिते पाटलांनी दिला भाजपा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 23:52 IST

Madha Lok Sabha Election  : माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला असून धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाला राजीनामा दिला आहे.

Madha Lok Sabha Election  : माढा लोकसभा मतदारसंघातून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. भाजपा नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज खासदार शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. तर दुसरीकडे रात्री भाजपा सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. हा भाजपासाठी पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का मानला जात आहे.

'मी माफी का मागावी? शाहू महाराज थेट वारसदार हे सिद्ध करा'; संजय मंडलिकांचा पलटवार

भाजपाने लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केली, या यादीत भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली. या उमेदवारीवरुन अकलूजचे मोहिते पाटील नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यावरुन काही दिवसापासून जोरदार चर्चा सुरू होत्या. धैर्यशील मोहिते पाटील खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढवणार अशा चर्चा सुरू होत्या. दरम्यान, आज धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली. यानंतर ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले होते. आता त्यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 

धैर्यशील मोहिते पाटील हातात तुतारी घेत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

बहुचर्चित माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार याची उत्सुकता कायम आहे. ही जागा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे असल्याने मागील काही दिवसांपासून अनेक नावांवर चाचपणी करण्यात आली. धैर्यशील मोहिते पाटील हे रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी मिळाल्यापासून नाराज होते. मोहिते पाटील समर्थकांनी अकलूजमध्ये बैठक घेऊन शक्तिप्रदर्शन केले होते. तेव्हापासून मोहिते पाटील हे पवारांसोबत जातील अशी चर्चा होती. त्यानंतर आज प्रत्यक्षात पुण्यात ही भेट झाली. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाची मोठी डोकेदुखी होणार आहे. १३ एप्रिलला धैर्यशील मोहिते पाटील हे अकलूज इथं शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करून हातात तुतारी घेत निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार हे आता जवळपास निश्चित मानलं जात आहे.

टॅग्स :BJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेस