शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
8
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
9
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
10
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
11
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
12
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
14
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
15
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
16
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
17
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
18
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
19
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
20
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या

शरद पवारांची खेळी यशस्वी ठरेल का?; माढा मतदारसंघात चुरशीची लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 9:26 AM

लक्षवेधी लढत : मोदींच्या सभेकडे लक्ष; ‘वंचित’चा फटका कोणाला?

विठ्ठल खेळगीसोलापूर : मोहिते-पाटील आणि रामराजेंचा विरोध असतानाही भाजपने माढ्याची उमेदवारी पुन्हा एकदा रणजीतसिंह निंबाळकरांना दिली. मात्र, मोहिते-पाटलांना पक्षात घेऊन शरद पवार यांनी मोठा डाव टाकला. त्यांची ही खेळी यशस्वी ठरणार की महायुतीतील पाच आमदारांच्या जोरावर निंबाळकर पुन्हा बाजी मारणार, याकडे लक्ष लागले आहे.

सन २००४ पर्यंत पंढरपूर लोकसभा मतदारसंघ असलेला आता माढा मतदारसंघ बनला. २००९ मध्ये शरद पवारांनी माढ्याचे नेतृत्व केले. २०१४ मध्येही विजयसिंह मोहिते-पाटलांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच ठेवला. त्यानंतर २०१९ मध्ये मोहिते-पाटलांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. भाजपने काँग्रेसमधून आलेल्या रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात प्रथम कमळ फुलले. यंदा मात्र मोहिते-पाटील भाजपच्या विरोधात आहेत. निंबाळकरांची भिस्त संजयमामा शिंदे व बबनराव शिंदे यांच्यावरच आहे.

मोहिते-पाटील अन् जानकर फॅक्टरपवारांची उमेदवारी मोहिते-पाटलांना दिल्यानंतर महायुतीचे नेते उत्तम जानकरांच्या पाठीमागे लागले. विमानातून प्रवास घडविला. अनेक ऑफर दिल्या. मात्र, जानकरांनी कार्यकर्त्यांमध्ये येऊन मोहिते-पाटलांना साथ देण्याची भूमिका जाहीर केली. मागील ३० वर्षांतील राजकीय संषर्घ संपुष्टात आला.

पाच आमदारही महायुतीकडेआ. संजयमामा शिंदे (करमाळा), आ. बबनराव शिंदे (माढा), आ. शहाजीबापू पाटील (सांगोला), राम सातपुते (माळशिरस), जयकुमार गोरे (माण-खटाव) हे पाचही आमदार महायुतीकडे आहेत. या आमदारांच्या जोरावरच निंबाळकर मैदानात उतरले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे रमेश बारसकर यांना मिळणाऱ्या मतांचा फटका कोणाला बसणार, यावर निकाल अवलंबून आहे. आता मोदींच्या गॅरंटीवर निंबाळकर मैदानात लढत आहेत. मोहिते-पाटलांनी पुन्हा जुन्या नेत्यांची मोट बांधली आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

निरा-देवघर सिंचन योजनेतील पाण्याचा विषय दोन्हींकडून मांडला जात आहे.फलटण ते पंढरपूर रेल्वेचा प्रश्न आणि एमआयडीसीच्या मुद्द्यावर दोघेही बोलत आहेत.केळी क्लस्टर, डाळिंब, द्राक्ष निर्यात, बेदाणा प्रक्रिया संशोधन केंद्र सुरू करण्याचे प्रश्नही आता पुढे आले आहेत.

२०१९ मध्ये काय घडले?रणजीतसिंह निंबाळकर भाजप (विजयी)    ५,८६,३१४ संजयमामा शिंदे      राष्ट्रवादी    ५,००,५५०ॲड. विजयराव मोरे    वंचित बहुजन आघाडी    ५१,५३२ नोटा    -    ३,६६६

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारmadha-pcमाढाmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४