शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

माचणूर - बेगमपुर पुलावर पाणी; सोलापूर - मंगळवेढा महामार्ग वाहतुकीसाठी बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 9:09 AM

भीमेच्या रुद्रावताराने पिकांची माती; नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याची तयारी सुरु

मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे

अतिवृष्टीमुळे उजनी धरणातून २ लाख ५० क्यूसेस व वीर मधून २५ हजार असा मोठा पावणेतीन लाख क्यूसेस चा महाविसर्ग भीमा नदीत सोडल्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील नदीकाठच्या सात गावात महापूरपरिस्थिती निर्माण झाली आहे . तालुक्यात  ऊस लागवड व पेरणीसाठी पाऊस थांबेल यासाठी  शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला असताना नदीकाठी मात्र महापूर आला असल्याने शेतकऱ्यांला विदारक परिस्थिती चा अनुभव पाहिला मिळत आहे दरम्यान पूरपरिस्थिती वर नियंत्रण ठेवण्यासाठी तहसीलदार स्वप्निल रावडे सकाळपासून भीमा नदीकाठच्या गावांना भेटी देऊन नागरिकांना धीर देत आहेत त्यांनी  महसुलची पथके तयार केली आहेत पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्यामुळे नदीकाठी हाहाकार उडाला असून भीमेने रौद्ररूप धारण केले आहे. तामदर्डी गावाचा संपर्क तुटला आहे

भीमा नदीकाठची मंदिरे पाण्याखाली गेली असून सोलापूर- मंगळवेढा हा महामार्ग सकाळी ९.३० वाजेपर्यंत पाण्याखाली जाणार  आहेभीमा नदी काठी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तालुका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे तालुक्यातील बठाण, उचेठाण, ब्रह्मपुरी, माचणूर, तामदर्डी, अरळी, सिद्धापूर, तांडोर, या सात गावाजवळ पुराचे पाणी पोहचले आहे भीमा नदी पात्राबाहेर पडल्याने नदी काठची हजारो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे . तामदर्दी गावाचा संपर्क तुटला आहे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी नदीकाठच्या गावांना भेटी देऊन पूर परिस्थिती चा आढावा घेऊन नदीकाठी वस्ती करून राहणाऱ्या ना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत या मार्गावर रहाटेवाडी मार्गे गावात पाणी येत असल्याने बोराळे ते माचनूर , रहाटेवाडी ते बोराळे हा मार्ग बंद झाले आहेत

बेगमपूरच्या पूलावर पाणी येण्यासाठी अडीच ते पावणेतिन लाख क्यूसेस पाण्याचा विसर्गाची गरज आहे. सन २००६ व २००७ या साली सलग दोन वेळा महापूर आल्याने बेगमपूर पूलावर जवळपास तीन फूट पाणी होते.  सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असून अजून दि १७ पर्यत  मुसळधार पावसाचा अंदाज सांगितला असल्याने  विसर्ग वाढला जाणार आहे त्यामुळे माचनूर -बेगमपूरच्या पूलावरही सकाळी ९.३० पर्यत  पाणी येण्याची शक्यता तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी वर्तवले आहे.

भिमा नदीकाठावर उचेठाण, बठाण, ब्रम्हपुरी, माचणूर, तामदर्डी, रहाटेवाडी, तांडोर, अरळी, सिध्दापूर ही गावे असून पूराचा पहिला फटका तामदर्डी गावाला बॅक वाटरमुळे बसला . तामदर्डी गावाला पाण्याने वेढल्यानंतर बेटासारखी आवस्था निर्माण झाली आहे . ही परस्थिती निर्माण होवू नये यासाठी रहाटेवाडी ते तामदर्डी दरम्यान मच्छीपुलाची गेल्या अनेक वर्षापासून ग्रामस्थांची मागणी आहे. मात्र अद्यापही पूर्ण झाली नाही. परिणामी महापूर आल्यानंतर गावाला संकटाशी सामना करावा लागतो आहे. तामदर्डी नंतर दुसरा फटका उचेठाण गावाला ओढयातून पाणी आल्यामुळे पाण्याने गाव वेडले जाते.

गावात जाण्यायेण्यासाठी होढीचा वापर वेळप्रसंगी करावा लागतो. इतर गावे उंचावर असल्यामुळे शक्यतो या गावांना पाण्याचा फटका बसत नाही मात्र शेतीचे क्षेत्र पाण्याखाली जात असल्यामुळे शेतकर्‍यांच्या पिकाचे मोठे आर्थिक नुकसान होते. तहसिलदार स्वप्निल रावडे यांनी   नदीकाठावरील  गावांना तलाठयांच्या समवेत भेटी देवून नागरीकांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच  तलाठी व सर्कल यांना निवाशी राहण्याच्या सुचना करण्यात आल्या. ग्रामस्थांना खबरदारी म्हणून पुराच्या वाहत्या पाण्यात प्रवेश करू नये असे आवाहन तहसिलदार रावडे यांनी केले आहे.

नदीकाठावर शेतीच्या सिंचनासाठी मोठया प्रमाणात विद्युत मोटारी बसविल्या आहेत. नदीला पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने कालपासून शेतकर्‍यांची मोटारी , पाईप  काढण्यासाठी लगबग सुरू होती. प्रशासनाकडून नदीकाठावरील शेतकर्‍यांना सावधानतेचा इशारा या पूर्वी दिल्याने मोटारी भिजून शेतकर्‍यांचे होणारेे नुकसान टळले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसriverनदीPandharpurपंढरपूर