शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मोहोळजवळ लक्झरी बसला ट्रकची धडक; कर्नाटकच्या महिलेसह दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 13:07 IST

मोहोळ : भरधाव वेगाने निघालेल्या लक्झरी बसने मालट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने अपघात होऊन बसमधील दोघेजण जागीच ठार झाले, ...

ठळक मुद्दे- भरधाव वेगात असलेल्या लक्झरी बसने मालट्रकला दिली धडक- दोघे जण ठार, एक जण गंभीर जखमी-  सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ शहराच्या शिवारात झाला अपघात

मोहोळ : भरधाव वेगाने निघालेल्या लक्झरी बसने मालट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने अपघात होऊन बसमधील दोघेजण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. हा अपघात शुक्रवारी पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ शहराच्या शिवारात घडला. 

अनिता चंद्रकांत पवार (वय ३२, रा. नेहरुनगर तांडा, ता. आळंद, जि. गुलबर्गा), तारानाथ बसवराज पवार (वय २८, रा. लखनापूर तांडा, ता. जेऊरगी, जि. गुलबर्गा) अशी मृतांची नावे आहेत. मालट्रकमध्ये (क्रमांक एम. एच. २५/ यू. २३१५)चिखर्डे (ता. बार्शी) येथून कांदा भरला होता.

२१ डिसेंबर रोजी हा ट्रक सोलापूर-पुणे महामार्गावरुन बंगळुरूकडे जाताना पहाटे सव्वातीन वाजता हा ट्रक शेतकी फार्मजवळ आला असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेली लक्झरी बस (क्रमांक के. ए. ३२/ सी. ८४०८) ने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील प्रवाशांपैकी अनिता चंद्रकांत पवार, तारानाथ बसण्णा उर्फ बसवराज पवार हे दोघे जागीच ठार झाले तर अशोक तारासिंग पवार (रा. गोळाबी, ता. आळंद, जि. गुलबर्गा,कर्नाटक) हा जखमी झाला. 

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी