Love Jidah: A similar marriage took place in the house of BJP leaders, what about it: Rohit Pawar | लव्ह जिहाद: भाजप नेत्यांच्या घरात अशीच लग्न झाली, त्याचे काय : रोहित पवार

लव्ह जिहाद: भाजप नेत्यांच्या घरात अशीच लग्न झाली, त्याचे काय : रोहित पवार

सोलापूर - राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी उत्तरप्रदेशातील लव्ह जिहादच्या कायद्यावर गुरुवारी आपले मत व्यक्त केले. मला खोलात जायचं नाही. कुणाच्या कुटूंबाबद्दलही बोलायचे नाही. पण भाजपच्या काही मोठ्या नेत्यांच्या घरात अशी लग्न झालेली आहेत. तिथं आपण याच पध्दतीनं म्हणायचा का?, असा सवाल त्यांनी केला. 


येथील फडकुले सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पवार म्हणाले, उत्तर प्रदेशात एक वर्षांनी निवडणुका आहेत. त्यामुळे असे विषय समोर येत आहेत. मूळात असे विषय हे व्यक्तीगत असतात. आज संविधान दिन आहे. संविधानाने दिलेला हक्क आहे. तिथे एसआयटी लावली होती. या कामासांठी पैसा लावला जातोय का? याची चौकशी झाली. पण यासाठी कुठल्याहा प्रकार नसल्याचे एसआयटीने दाखवून दिले आहे. 


भाजप आमदार राम कदम यांनी महाराष्ट्रात असा कायदा करु  म्हटले आहे. यावरही रोहित पवारांनी भाष्य केले. राम कदम यांना सांगा की बेरोजगारी मोठी आहे. मुलांच्या पोटाचं बघुया. मुलांच्या हातानं काम मिळवून देऊया. युवकांना दिशा देऊया. उगाचच तुम्ही दुसऱ्या मुद्याच्या दिशेने गेलात तर पिढी बरबाद होईल. लोकांची स्वप्न बरबाद होतील. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, मनोहर सपाटे, अजिंक्यराणा पाटील, सुभाष गुळवे आदी उपस्थित होते. 


पार्थ पवारांसोबतच माझं नातं महत्त्वाचं 

पार्थ पवारांना डावलून रोहित पवारांना बळ दिल्याची खंत अजित पवारांना असल्याचा दावा एका पुस्तकात करण्यात आला आहे. याबद्दल रोहित पवार म्हणाले, पुस्तक कुठलही असलं तरी ते लिहिणाऱ्याच्या डोक्यानं लिहिलं जातं. माझ्यासाठी नातं महत्त्वाचं आहे. हे नातं त्या लिहिणाऱ्यापेक्षा मोठं आहे. 
----
विमानसेवेवरही भाष्य

विमानसेवा नसल्याने सोलापुरात उद्योग येत नाहीत या मताशी मी सहमत नाही. परंतु, सोलापुरातील विमानतळासाठी सुशीलकुमार शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. आगामी काळात मी सुध्दा यासाठी प्रयत्न करेन.

Web Title: Love Jidah: A similar marriage took place in the house of BJP leaders, what about it: Rohit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.