शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

‘लोकमत’ बांधावर; परतीच्या पावसानं तोंडाशी आलेला घास हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 2:50 PM

मंगळवेढा तालुका; ज्वारीच्या कोठाराला लागली दृष्ट; गतवर्षी पावसाअभावी पेरणी झाली नव्हती

ठळक मुद्देमंगळवेढा हे ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते. मात्र यावर्षी परतीच्या पावसाने दृष्ट लागलीमंगळवेढा, ब्रह्मपुरी, बोराळे, मुंढेवाडी शिवारात रब्बी हंगामातील पिके उगवून आल्यानंतर पाऊस पडलापहिल्यांदा परतीच्या पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातल्याने पिकाचे गणित पूर्णत: कोलमडले

मल्लिकार्जुन देशमुखे 

मंगळवेढा : आतापर्यंत अनेक वेळा पावसाळ्यात भरपूर पाऊस पडला; पण तो ठराविक अंतराने उघडीप द्यायचा.. पिकाला नुकसानकारक ठरत नसायचा.. दिवाळीला पण कधी कधी एक-दोन दिवसांचा होत असायचा. यंदा परतीचा असा पहिल्यांदा पाऊस पाहिला. हातातोंडाशी आलेला घास या परतीच्या पावसाने हिरावून घेतला आहे, असं बुजुर्ग मंडळींनी ‘लोकमत’शी बोलताना आपली व्यथा मांडली. ज्वारीचं कोठार समजल्या जाणाºया मंगळवेढा तालुक्याला यंदा दृष्ट लागल्याचेही निराशाजनक सूर उमटू लागले आहेत. काळ्या आईची मोठ्या अपेक्षेने ओटी भरली; पण गेल्या पंधरा दिवसांपासून धुमाकूळ घातलेल्या पावसाने अक्षरश: आमच्या लक्ष्मीची माती झाली आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तीने बळीराजाचे अश्रू आटले. त्याचा कुणी ठाव घ्यावा का, अशी काळजाला भिडणारी आर्त हाक भाळवणी येथील शेतकरी महादेव कांबळे यांनी दिली.

मंगळवेढा तालुक्यातील भीमा नदीकाठची आठ ते दहा गावे सोडली तर तालुक्यातील उर्वरित गावात शेतीला पूरक पाण्याची कोणतीही स्वतंत्र व्यवस्था नसल्याने बागायती क्षेत्र फार कमी आहे. या परिसरात खरीप आणि रब्बी हंगामातील पिके घेतली जातात. खरीप हंगामात प्रामुख्याने बाजरी, भुईमूग, तूर, मटकी, मका, सूर्यफूल तर रब्बीमध्ये ज्वारी, हरभरा, गहू, मका आदी पिके घेतली जातात.तालुक्यात ५१ हजार १७८ हेक्टर रब्बीचे क्षेत्र असून, आजपर्यंत ४४ हजार १२० हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. जवळपास ८७ टक्के पेरणी झाली आहे. ज्या शेतकºयांनी कांदा काढला, तो पावसात भिजून सडून गेला तर रब्बीत लागवड केलेला कांदा सरीतील पाणी न हटल्याने पाण्याने करपून जात आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

पिकांचे गणित कोलमडले- मंगळवेढा हे ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते. मात्र यावर्षी परतीच्या पावसाने दृष्ट लागली आहे. मंगळवेढा, ब्रह्मपुरी, बोराळे, मुंढेवाडी शिवारात रब्बी हंगामातील पिके उगवून आल्यानंतर पाऊस पडला नाही, तरी निवळ थंडीवर परिपूर्ण येतात. मात्र यावर्षी पहिल्यांदा परतीच्या पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातल्याने पिकाचे गणित पूर्णत: कोलमडले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकºयांना काहीही अंदाज बांधता येत नसल्यामुळे तो मोठ्या संकटात सापडला आहे. 

परतीच्या पावसाने शेतकºयांचे झालेले नुकसान भरून न येणारे आहे. शेतकºयांना शासनाने संपूर्ण कर्जमाफी द्यावी. अनुदान देऊन उपयोग होणार नाही, महागडी औषधे फवारणी करून आर्थिक नुकसान झाले आहे. त्यात पिके सडून गेली आहेत.- अनिल बिराजदार, शेतकरी सिद्धापूर

गेल्या काही दिवसांपासून पडणाºया पावसामुळे पिके भुईसपाट झाली आहेत. कांद्याची रोपे सडून गेली आहेत. तीन वर्षे पाऊस नव्हता. यावर्षी झालेल्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला.- समाधान शिरसट, शेतकरी ब्रह्मपुरी

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीdroughtदुष्काळRainपाऊस