शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

Lok Sabha Election 2019; राजकीय पक्षांचे परदेशी झेंडे सोलापुरात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 2:32 PM

सोलापूर : लोकसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच सर्वच पक्षात हालचालींनी वेग घेतला. अनेकांकडून प्रचारासाठीची मैदाने निश्चित होत आहेत. याबरोबरच वातावरण ...

ठळक मुद्देलोकसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच सर्वच पक्षात हालचालींनी वेग घेतला.  प्रचाराचा रंग गडद करणारे देशातील विविध पक्षांचे झेंडे सध्या चीनमधून सोलापुरात दाखलगेल्या काही वर्षांपासून राजकीय पक्षांचे झेंडे आणि प्रचाराचे अन्य काही साहित्य निवडणूक काळात चीनमधून मागवले गेले

सोलापूर : लोकसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच सर्वच पक्षात हालचालींनी वेग घेतला. अनेकांकडून प्रचारासाठीची मैदाने निश्चित होत आहेत. याबरोबरच वातावरण पक्षांच्या झेंड्यांनी ढवळून निघेल, यासाठी प्रयत्न करताहेत प्रचाराचा रंग गडद करणारे देशातील विविध पक्षांचे झेंडे सध्या चीनमधून सोलापुरात दाखल झाले आहेत. प्रचार कार्यक्रम सुरू होताच या झेंड्यांची मागणी होणार असल्याने झेंडे विक्रेत्यांचे कुटुंब आणि नोकरवर्ग विभागणी आणि वर्गवारी करण्याच्या कामात गुंतला आहे.

गेल्या काही वर्षांपासून राजकीय पक्षांचे झेंडे आणि प्रचाराचे अन्य काही साहित्य निवडणूक काळात चीनमधून मागवले गेले आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात झेंडे आणि साहित्य चीनमधून उपलब्ध झाले आहे़ अनेक व्यापाºयांच्या गोडावूनमध्ये हा माल उतरवला गेला आहे़ या मालाचा साठा व्यवस्थित करण्याचे काम कामगार वर्गाकडून सुरू आहे.

मागील सहा महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीची चर्चा आहे़ या काळात प्रचारासाठी बॅच, बिल्ला, बॅनर, झेंडे, स्टिकर अशा अनेक प्रकारचे सर्वच पक्षांना साहित्य लागते़ मात्र हे साहित्य भारतीय उत्पादनापेक्षा कमी किमतीत मिळणाºया चायनीज प्रचार साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे़ चायनीज बनावटीचे सर्वच राजकीय पक्षांचे चिन्ह असलेले झेंडे, बिल्ले, टोप्या, उपकरणे, उपरणे, छत्र्या, फुगे, मुखवटे यंदा मोठ्या प्रमाणात बाजारात येण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे़ 

 नरेंद्र मोदी, राहुल गांधींचे मुखवटे दाखल - लोकप्रिय व्यक्तींची छायाचित्रे आणि मुखवटे वापरण्याचा अनेकांना छंद असतो़ अशा वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांचे मुखवटे, झेंडे विक्रेत्यांकडे दाखल झाले आहेत़ लहान मुलांपासून ते साºयाच जणांच्या चेहºयावर बसतील, असे प्लास्टिक मुखवटे दाखल झाले आहेत़ आचारसंहिता असल्यामुळे हे साहित्य अद्याप बाहेर पडलेले नाही़ 

ईव्हीएम प्रात्यक्षिक मशीन - स्थानिक पातळीवर तयार योग्य उमेदवाराला मतदान व्हावे, याबाबत मतदारांमध्ये प्रबोधन करण्यासाठी लागणारी ईव्हीएम मशीन झेंडे विक्रेत्यांनी स्थानिक पातळीवर बनवली आहेत़ मतदान केल्यानंतर येणारे ‘बीप’ आवाज, मशीनवरील उमेदवाराच्या चिन्हाची ओळख अशा अनेक बाबींची माहिती या प्रात्यक्षिक मशीनद्वारे केली जाणार आहे़

सोलापुरात झेंडे आणि प्रचाराचे साहित्य विक्री करणारे काही व्यावसायिक आहेत़ निवडणूक होईपर्यंत हा काळ आमच्यासाठी लगीनघाईचा म्हणावा लागेल़ निवडणुकीनंतर हे काम राहत नाही़ कोणाला किती झेंडे, बॅनर, टोप्या लागतील याचा अंदाज घेऊन हे साहित्य मागविले जात आहे़ शिवाय निवडणूक आयोगाचे साºयांवर लक्ष असते़ - गणेश पिसे प्रचार साहित्य विक्रेते

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकchinaचीन