अडीच हजार मुलांचे जीवन केले प्रकाशमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:43 IST2020-12-05T04:43:07+5:302020-12-05T04:43:07+5:30

जन्मगाव चिंचोली, ता. माढा. घरची परिस्थिती बेताचीच. पण कधीही त्याचा गवगवा केला नाही. शिक्षणाच्या सर्वच टप्प्यात यश मिळविले. महाविद्यालयीन ...

The lives of two and a half thousand children have been enlightened | अडीच हजार मुलांचे जीवन केले प्रकाशमय

अडीच हजार मुलांचे जीवन केले प्रकाशमय

जन्मगाव चिंचोली, ता. माढा. घरची परिस्थिती बेताचीच. पण कधीही त्याचा गवगवा केला नाही. शिक्षणाच्या सर्वच टप्प्यात यश मिळविले. महाविद्यालयीन शिक्षण घेताना बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेण्यास सुरुवात केली. बघता बघता ते विद्यापीठात बुद्धिबळचे आयकॉन बनले. पदवीनंतर पुण्यात राहून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली अन् २००६ साली या परीक्षेत उत्तीर्ण होऊन कोषागार विभागात अधिकारी झाले. त्यानंतर त्यांनी कधी आयुष्यात माघारी वळून पाहिलेच नाही.

याही क्षेत्रात उमठवला ठसा

२०१५ साली त्यांची माढ्यात बदली झाली. त्यानंतर आपल्या गावासाठी, तालुक्यासाठी काहीतरी करावे म्हणून रोजचे शासकीय काम उरकून सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात हिरिरीने भाग घेऊ लागले. पाणी फाउंडेशनच्या कामातून आठ बंधारे दुरुस्ती केले. चार किलोमीटर खोदकाम लोकसहभागातून करून घेतले. पंचवीस एकरात सीसीटी बनविल्या आहेत. चिंचोली गावात स्वतः परिश्रम करीत पाच हजार झाडे लावली. त्याचा सध्या गावाला खूप फायदा होत आहे. या कामांमुळे गावचा कायापालट होऊन करोडो लिटर पाणी साचून गावचा टँकर कायमस्वरुपी बंद झाला. सर्वच विहिरी, बोअरची पाणी पातळी वाढली. परिणामी बागायती क्षेत्रात वाढ झाली. त्यांनी आपल्या कामाच्या शैलीतून माढा तालुक्यात एक वेगळाच ठसा उमटवला आहे.

फोटो

०२कुर्डूवाडी-अविनाश लोंढे ०१,०२

Web Title: The lives of two and a half thousand children have been enlightened