शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

लर्निंग लायसन्सचा उडाला बोजवारा

By admin | Updated: August 6, 2014 01:17 IST

सर्व्हर ठप्प : दहा मिनिटांच्या परीक्षेसाठी खर्च करावा लागतो दिवस

सोलापूर: उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात लर्निंग लायसन्स विभागातील सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने सर्व संगणक ठप्प झाले. त्यामुळे दहा मिनिटांच्या परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना अख्खा दिवस खर्च करावा लागला. संगणकात होणाऱ्या बिघाडामुळे अनेक उमेदवारांना नापासाचा शेरा मारून त्यांना पुन्हा आठ दिवसांनी येण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे अनेक उमेदवार हताश होऊन अखेर एजंटांकडे जात आहेत. ही संगणकीय यंत्रणा एजंटांना चालना देण्यासाठीच तयार केली असल्याची शंका उमेदवारांनी व्यक्त केली.सोलापुरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (डेप्युटी आरटीओ) शहरापासून (एसटी स्टँड) तब्बल साडेसहा किमी लांब असलेल्या सुंंदरम नगर येथे स्थलांतरित होऊन सुमारे दहा वर्षे उलटली. नवीन इमारत, चाचणी धावपट्टीचे थाटात उद्घाटन होऊनही पाच वर्षे उलटून गेली मात्र अद्याप लर्निंग लायसन्स देणाऱ्या व्यवस्थेची यंत्रणा परिपूर्ण झाली नाही. लर्निंग लायसन्स काढायला येणाऱ्यांची भली मोठी संख्या त्या तुलनेने परीक्षेसाठी उपलब्ध असणारे तुटपुंजे संगणक, त्यातही ऐन परीक्षेत ठप्प होणारा सर्व्हर आणि दुपारच्या वेळी एजंटांची थेट परीक्षागृहात होणारी घुसखोरी यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालातील लर्निंग लायसन्स विभागाचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. आरटीओ कार्यालयाची नवीन इमारत उभी राहिली तेव्हा त्याच्या दुसऱ्या मजल्यावर लर्निंग लायसन्ससाठी पहिल्यांदा संगणकीकृत परीक्षा सुरु झाली. एकाचवेळी ३० उमेदवार परीक्षा देऊ शकतील अशी व्यवस्था येथे निर्माण केली होती. मात्र सर्व उमेदवारांसाठी एकाच मोठ्या स्क्रीनवर प्रश्न विचारले जात असल्याने या चाचणीवेळी एकमेकांशी चर्चा करुन वा कॉपी करुन उत्तर देण्यावर नियंत्रण मिळत नव्हते. मात्र गेल्या आठ महिन्यांपासून येथील संपूर्ण यंत्रणा उलचून मुख्य इमारतीच्या मागील भागात हलविण्यात आली. तीन खोल्या आणि पत्राशेडमध्ये असलेल्या ठिकाणी जागा मोठी असली तरी केवळ १८ संगणक असल्यामुळे एकाच वेळी १८ उमेदवार या ठिकाणी परीक्षा देऊ शकतात. शिवाय त्यातील काही संगणक नेहमीच नादुरुस्त असल्याने त्यामध्ये आणखी घट होते. अनेक वेळा सर्व्हरमध्ये बिघाड झाला की सर्व संगणक ठप्प होतात. ते दुरुस्तीसाठी अभियंत्याला बोलावण्यापासून ते दुरुस्तीपर्यंत सुमारे दोन तास लागतात़ त्यामुळे दहा मिनिटांच्या परीक्षेसाठी उमेदवारांना अख्खा दिवस वाया घालवावा लागतो. शिवाय लायसन्स काढण्यासाठीचे टप्पे कसे आहेत हे दर्शवणारा फलकही दर्शनीय ठिकाणी लावला नाही, त्यामुळे उमेदवारांचा गोंधळ आणि कर्मचाऱ्यांना सूचनांसाठी कायम तोंडाचा पट्टा सुरु ठेवावा लागतो. एखादाही कागद अपुरा ठरणार असेल तर त्याला समजावून सांगण्याऐवजी बाहेरचा रस्ता दाखवला जातो. जणू उमेदवार हाताश होऊन एजंटाकडेच जावा हाच उद्देश असतो.---------------------------------------चाचणी धावपट्टीपेक्षाही कठीण...पक्के लायसन्स मिळविताना गाडी चालविण्याच्या चाचणी परीक्षेसाठी हजारो रुपये खर्च करुन धावपट्टी तयार करण्यात आली आहे. चालक वाहन चालविण्यात तरबेज आहे की नाही हे तपासण्यासाठी या चाचणी धावपट्टीवर उतार-चढ, गोलाकार वळण, बोगदा असे अनेक अडथळे निर्माण करण्यात आले आहेत. मात्र त्यापेक्षा कठीण मार्ग लर्निंग लायसन्स विभागाकडे जाणारा आहे. पावसामुळे प्रचंड चिखलमय झालेल्या या कच्च्या रस्त्यावर वाहनावरून जाणे लांबच मात्र पायी जातानाही कसरत करावी लागते. नवीन रिक्षाधारकांना पासिंगसाठी अशा चिखलातूनच नव्या रिक्षा घेऊन जावे लागते़ त्यामुळे गाडीला नंबर आणि चिखल आधी लागतो. किमान हा रस्ता तरी व्यवस्थित करावा, अशी मागणी होत आहे.