भारत जोडो यात्रेत सोलापुरातील महाआघाडीचे नेते सहभागी होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 14:15 IST2022-11-14T14:14:50+5:302022-11-14T14:15:01+5:30
काँग्रेस नेते नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते सहभागी होतील असे काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

भारत जोडो यात्रेत सोलापुरातील महाआघाडीचे नेते सहभागी होणार
राकेश कदम
सोलापूर :
काँग्रेस नेते नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते सहभागी होतील असे काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
वाले यांनी सोमवारी येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार या यात्रेत सहभागी होत असल्याचे सेना आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, काँग्रेसचे माजी गटनेते चेतन नरोटे, शिवसेना शहर प्रमुख विष्णू कारमपुरी, महेश गादेकर, मनोहर सपाटे, संजय हेमगड्डी आधी उपस्थित होते.