शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

‘उजनीचं पाणी मराठवाड्याला जातंय’ असं सांगताच नेते म्हणाले, ‘लोक तर साधं ओढ्याचं पाणी वळवू देत नाहीत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 3:08 PM

सोलापूर : उजनी धरण भरलेलं असताना सोलापूरकरांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. अशात आता उजनीचे पाणी मराठवाड्याला ...

ठळक मुद्देकै. शंकरराव मोहिते-पाटील आदर्श गोपालक व पशुमित्र, कृषीनिष्ठ आणि कृषीमित्र पुरस्कार वितरण सोहळा उजनीचे पाणी मराठवाड्याला देताना वरील धरणातून २५ टीएमसी पाणी सोडण्याची तरतूद

सोलापूर : उजनी धरण भरलेलं असताना सोलापूरकरांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. अशात आता उजनीचे पाणी मराठवाड्याला नेण्याची तयारी झाली आहे, अशी चिंता झेडपीचे कृषी व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी व्यक्त केली. त्यावर झेडपीचे अध्यक्ष संजय शिंदे म्हणाले, काळजी करू नका, लोक ओढ्याचे पाणी वळवू देत नाहीत. उजनीचे पाणी मराठवाड्याला देताना वरील धरणातून २५ टीएमसी पाणी सोडण्याची तरतूद करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी रंगभवन सभागृहात आयोजित कृषीमित्र पुरस्कार वितरण सोहळ्यात उजनी धरणाच्या पाण्यावर चिंतन झाले.

झेडपीच्या कृषी व पशुसंवर्धन विभागातर्फे  कै. शंकरराव मोहिते-पाटील आदर्श गोपालक व पशुमित्र, कृषीनिष्ठ आणि कृषीमित्र पुरस्कार वितरण सोहळा झेडपीचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. याप्रसंगी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, उपाध्यक्ष शिवानंद पाटील, सभापती मल्लिकार्जुन पाटील, विजयराज डोंगरे, रजनी देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, सदस्य भारत शिंदे, मदन दराडे, संजय गायकवाड, रेखा राऊत, विभीषण आवटे, मीनाक्षी जगताप, मंजुळा कोळेकर, पंढरपूरचे सभापती राजेंद्र पाटील, मंगळवेढ्याचे सभापती प्रदीप खांडेकर, दक्षिणच्या सभापती सोनाली कडते, श्रीमंत थोरात, गहिनीनाथ नाईकनवरे, मंगल वाघमोडे, स्वाती कांबळे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. चंद्रशेखर दैवज्ञ, कृषी विकास अधिकारी साहेबराव बेंदगुडे उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढल्याने मानवी आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम दिसत आहेत. त्यामुळे नैसर्गिक शेती ही काळाची गरज बनली आहे. पण शेतकºयांना पायाभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असून नेमके याकडेच सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. अध्यक्षीय भाषणात संजय शिंदे यांनी कृषी क्षेत्रात प्रयोगशील काम करणाºयांना पुरस्कार देऊन स्फूर्ती देण्याचे काम झेडपीने केले आहे. नवीन तंत्रज्ञान स्वीकारून शेतकरी शेतीत प्रयोग करीत आहेत, ही चांगली गोष्ट असल्याचे नमूद केले. यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती मल्लिकार्जुन पाटील, अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांचे मार्गदर्शन झाले. पुरस्कार शेतकºयांचा फेटा, शाल, स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 

शिंदे—ढोबळे यांच्यात संवादझेडपीचे अध्यक्ष संजय शिंदे दोन आठवड्यानंतर सोलापुरात आले. कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बसलेले असताना माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचा त्यांना सारखा कॉल येत होता. शेवटी त्यांनी रंगभवन सभागृहात असल्याचे शिंदे यांनी सांगितल्यावर ढोबळे तेथे आले. समोर प्रेक्षकगृहात बसल्यावर शिंदे यांनी त्यांना व्यासपीठावर येण्यास सांगितले. त्यानंतर दोघांत सतत संवाद सुरू होता. हे दोघे नेमके काय बोलत असावेत याचीच चर्चा सभागृहात सुरू झाली.

पुरस्कारप्राप्त शेतकरी असेआदर्श गोपालक : विनायक पाटील, समीर भोरे, किरण सावंत, धनंजय शिंदे, सचिन बाबर, भिवा शिंदे, दत्तात्रय शिंदे, शशिकांत नागटिळक, मल्लिकार्जुन कोले, अर्जुन घाडगे, दत्तात्रय ढेकळे. कृषीनिष्ठ : बसवराज बेळ्ळे, दत्तात्रय पाटील, अभिजित भांगे, रुपाली काळे, शरद शिंदे, अमोल लाड, बाबासाहेब थोरात, बाळासाहेब यलगोंडे, काशिनाथ कदम, विजय गवळी, नितीन पाटील. शासन पुरस्कृत कृषिभूषण: अतुल बागल, शशिकांत पुदे, तुकारात पडवळे, रामचंद्र आलदर, मकरंद सरगर. कृषीमित्र : शंकर मिरगणे, भीमराव सूळ, सिद्धेश्वर नागटिळक, सचिन चव्हाण, शंकर पाथरवट. उत्कृष्ट सरपंच व ग्रामसेवक : नारायण ढवळे (ग्रामसेवक, शेगाव दुमाला), विष्णू अरकले (सरपंच, शेगाव दुमाला), संगनबसप्पा ठक्का (ग्रामविकास अधिकारी, करजगी), प्रिया तोडकरी (सरपंच, करजगी), बालम बादशहा कोरबू (ग्रामसेवक , बोंडले), राखी गायकवाड (सरपंच, बोंडले).

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद