Sangola Crime : ऊस तोडणी कामगार पतीने पत्नीचा साडीने गळा आवळून खून केला आणि त्यानंतर ऊस तोडणी मुकादामाच्या त्रासाला कंटाळून स्वतः ही पत्र्याच्या खोलीत लोखंडी अँगलला स्टोलने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री ९:३०च्या सुमारास कोळे ता. सांगोला येथील कोळे-बानुरगड रोडवरील हांडे वस्ती नजीक घडली.
समाधान बबन चव्हाण (वय ३०), अश्विनी समाधान चव्हाण (वय २५) असे मृत पती पत्नीचे नावे आहेत. याबाबत, दादा मोहिते यांनी खबर दिली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
गुरुवारी त्याने जुनोनी येथील मेव्हणे दादा मोहिते यांच्या मोबाइलवर फोन करून पत्नी अश्विनीस मी कोळे येथे येणार असून, माझे कपडे व जेवण घेऊन ये, असे म्हणाला. तो त्याचा मित्र अश्विनीसह तिघे जण मिळून दुचाकीवरून सायंकाळी ४:३०च्या सुमारास प्रमोद देशमख यांच्या शेतातील वस्तीवर गेले असता, अश्विनीला त्या ठिकाणी सोडले. तिने भाऊ दादा याला 'तू मला एक तासाने फोन कर,' असे म्हणाल्यानंतर ते दोघे जण दुचाकीवरून परत जुनोनी येथे परतले. त्यानंतर, दादाने रात्री ९:३० वाजता समाधान याच्या मोबाइलवर फोन केला असता बंद लागला, म्हणून दादा मोहिते व त्याची आई दुचाकीवरून या ठिकाणी गेले. पत्र्याच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता, म्हणून त्यांनी जोराने ढकलला असता, समाधान खोलीतील पत्राच्या लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचे दिसले, तर अश्विनी ही खोलीतील बेडवर मयत अवस्थेत पडली होती. घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतांचे पंचनामे केले आणि पुढील तपास सुरु केला.
उचल घेतल्याने लपून-छपून राहत होता
मृत, समाधान चव्हाण याने दोन-तीन मुकादमाकडून ऊस तोडणीसाठी कामावर येतो म्हणून लाखो रुपयांची उचल घेतली होती. पण प्रत्यक्षात तो ऊसतोडणीसाठी न जाता मुकादामांची नजर चुकवून जुनोनी व कोळे परिसरात लपून-छपून राहत होता.
Web Summary : In Sangola, a sugarcane worker strangled his wife and then hanged himself due to harassment from his supervisor and debt. Samadhan Chavan (30) and Ashwini Chavan (25) were found dead in their room. Police are investigating.
Web Summary : सांगोला में एक गन्ना श्रमिक ने अपनी पत्नी का गला घोंट दिया और फिर पर्यवेक्षक और कर्ज से तंग आकर खुद को फांसी लगा ली। समाधान चव्हाण (30) और अश्विनी चव्हाण (25) अपने कमरे में मृत पाए गए। पुलिस जांच कर रही है।