हॉटेल मालकावर चाकूने वार

By Admin | Updated: June 11, 2014 00:50 IST2014-06-11T00:50:29+5:302014-06-11T00:50:29+5:30

वेळेत सेवा दिली नाही म्हणून संतप्त ग्राहकाचा प्रकार

Knife-hit hotel master | हॉटेल मालकावर चाकूने वार

हॉटेल मालकावर चाकूने वार


सोलापूर : नाना तऱ्हेचे ग्राहक असतात. कुठल्या ग्राहकाचा पारा कधी चढेल हे सांगता येत नाही. असाच एका संतप्त झालेल्या ग्राहकाकडून हॉटेल चालकाला चांगलाच प्रसाद मिळाला. वेळेत आईस्क्रीम न दिल्याने चिडलेल्या ग्राहकाने हॉटेल चालकास मारहाण केली.
हत्तुरे वस्तीतील हरिहर स्वीट होममध्ये एक अनोळखी ग्राहक आला. त्याने हॉटेल मालक शंकर भिवाजी चौधरी यांच्याकडे आईस्क्रीमची मागणी केली. वेळेत आईस्क्रीम न आल्याने त्याने थेट चौधरी यांच्या डोक्यावर चाकूने वार केला. त्यात शंकर चौधरी हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी भाऊ गणेश चौधरी याने शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सिव्हिल चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.

Web Title: Knife-hit hotel master