कॅरमबोर्डच्या छिद्रात अडकलेल्या मांजराच्या पिलाची झाली सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 11:34 IST2020-03-27T11:32:01+5:302020-03-27T11:34:21+5:30
सोलापुरातील नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलच्या सदस्यांच्या प्रयत्नाला आले यश

कॅरमबोर्डच्या छिद्रात अडकलेल्या मांजराच्या पिलाची झाली सुटका
सोलापूर : बाळे येथील डांगे नगर येथे एका घरात भिंतीला उभे करून ठेवलेल्या कॅरमबोर्डच्या छिद्रातून एक मांजराचे पिलू अडकले. बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असताना त्याची मान छिद्रातून निघत नव्हती. नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलच्या सदस्यांनी मांजराच्या पिलाची सुटका केली.
एका घरामध्ये कॅरम बोर्ड खाली काढण्यात आले होते. बोर्डच्या छिद्रामध्ये मांजराचे पिलू अडकले. सुटकेसाठी त्या पिलाची धडपड सुरू झाल्याने भिंतीला उभा केलेला कॅरम बोर्ड पडला.
बाहेर निघण्याच्या प्रयत्नात ते पिलू अधिकच घट्ट अडकल्याने त्यास पुन्हा माघारी फिरता येईना. त्या छिद्रातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात सुटका करण्यासाठी जाणाºयांना पंजाद्वारे ओरखडत असल्याने त्यास मदतीसाठी कुणी पुढे आले नाही. संतोष धाकपाडे, सोमानंद डोके, सुरेश क्षीरसागर यांना माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. त्या पिलाच्या डोळ्यावर कापड टाकून दुसºया एका कापडाच्या साह्याने त्यास अलगद त्या छिद्रातून बाहेर काढल्याचे सांगितले.