लोकमत न्यूज नेटवर्क: सोलापूरआगामी सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. यात कोणीही सुद्ध नये, शिवाय आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. सलग दोन दिवसांत पोलिसांनी केलेल्या कारवाईत विनापरवाना सभा घेणाऱ्या एमआयएमचा माजी नगरसेवक अजहर अब्दुल गणी हुंडेकरी व पत्त्याचा क्लब चालवण्यात नाव आलेल्या काँग्रेसच्या माजी नगरसेवक रियाज हुंडेकरीवर गुन्हा दाखल झाला आहे.
बुधवार २४ डिसेंबर रोजी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास नई जिंदगीतील आयेशानगरसमोर एमआयएमचे माजी नगरसेवक अजहर अब्दुल गणी हुंडेकरी, अजहर शेख, विनापरवाना घेतलेला एमआयएमचा हाच तो मेळावा. अजहर जागीरदार, शोहेब चौधरी, मुनवर शेख, जब्बार शेख यासह इतर चार ते पाच अनोळखी इसम (सर्व रा. नई जिंदगी) यांनी आचारसंहिता चालू असताना बेकायदेशीरपणे जमाव जमून विनापरवाना सार्वजनिक ठिकाणी मेळावा घेतला. याप्रकरणी कॉन्स्टेबल महेश रामचंद्र माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील सर्वांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे.
शहर गुन्हे शाखेने सात रस्ता परिसरातील इंडियन टी हाउसजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मंगळवारी रात्री १२ च्या सुमारास धाड टाकली. हा अड्डा काँग्रेसचे माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी व रौफ भंडाले यांच्या माध्यमातून सुरू होते, यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या छाप्यात २ लाख ३१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. छाप्यादरम्यान जुगार खेळत असलेले तीस जण रंगेहाथ सापडले. या कारवाईत आरोपींकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, मोबाइल, कॅल्क्युलेटर व इतर साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिसांकडून आवश्यकती ती खबरदारी घेण्यात येत आहे. शांतता बिघडविण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्यांच्यावर काठोर कारवाई केली जाईल.
शहरातील अवैध धंद्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील. निवडणूकीच्या काळात कोठे अनुचित प्रकार घडत असल्याची माहिती नागरिकांनी यंत्रणेला द्यावी. संबंधितांची नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
एम. राजकुमार, पोलिस आयुक्
या जुगार खेळणाऱ्यांना बजावल्या नोटिसा..
जुगार घेताना पकडलेले जावेद शेख, राजू जाधव, अशपाक शेख, जयराज सांगे, चिनायक गायकवाड, प्रताप गायकवाड, कल्याणी आडके, मनीष जाधव, शंकरगौडा पाटील, विक्रम गायकवाड, जाकीर शेख, यल्लप्पा जाधव, सिद्धराम कोनिन, चांद नदाफ, जगन पात्रे, अब्दुल पठाण, जिलानी विजापुरे, जगदीश भुताळे, इरफान मलगान, गोरख घुले, कपिल कांबळे, विजय ऊर्फ गुहू जाधव, बिलाल शेख, शफीक शेख, लक्ष्मण आसादे व कारवाई वेळू पळून गेलैले दीपक जाधव, विकास गायकवाड, इसाक अत्तार, वसीम पठाण, युन्नूस शेख यांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांच्यावरही कारवाई केली. वरील सर्वांना नोटीस देण्यात आले.
Web Summary : Ahead of Solapur elections, police cracked down on illegal activities. Cases filed against ex-corporators from MIM and Congress for unauthorized gatherings and gambling dens. Thirty individuals were arrested with seized assets worth ₹2.31 lakh.
Web Summary : सोलापुर चुनाव से पहले, पुलिस ने अवैध गतिविधियों पर शिकंजा कसा। एमआईएम और कांग्रेस के पूर्व पार्षदों के खिलाफ अनाधिकृत सभाओं और जुआ अड्डों के लिए मामले दर्ज। तीस व्यक्तियों को ₹2.31 लाख की जब्त संपत्ति के साथ गिरफ्तार किया गया।