सोलापुरात भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्त्यांचा जल्लोष
By राकेश कदम | Updated: March 2, 2023 16:39 IST2023-03-02T16:17:54+5:302023-03-02T16:39:22+5:30
काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू कारमपुरी यांच्यासह कार्यकर्ते टिळक चौकात एकत्र जमले. हा परिसर भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

सोलापुरात भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्त्यांचा जल्लोष
सोलापूर : पुण्यातील कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर विजयी झाले. शहरातील काँग्रेस आणि शिवसेनेच्या (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांनी टिळक चौकात एकत्र जमून जल्लोष केला.
काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू कारमपुरी यांच्यासह कार्यकर्ते टिळक चौकात एकत्र जमले. हा परिसर भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. काँग्रेस आणि सेनेच्या कार्यकर्त्यांनी लोकमान्य टिळक पुतळ्याला अभिवादन केले. गुलालाची उधळण केली. दोन्ही पक्षाचे झेंडे फिरवत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पोटनिवडणुकीतील ट्रेंड आगामी निवडणुकीत कायम राहील. उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजप हद्दपार होईल, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले.