सोलापुरातील जेष्ठ कलाकार जॉन येवलेकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 11:20 IST2020-12-10T11:19:57+5:302020-12-10T11:20:22+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

John Yevlekar, a veteran artist from Solapur, passed away | सोलापुरातील जेष्ठ कलाकार जॉन येवलेकर यांचे निधन

सोलापुरातील जेष्ठ कलाकार जॉन येवलेकर यांचे निधन

सोलापूर - सोलापूरातील जेष्ठ कलाकार जॉन येवलेकर यांच बुधवार 9 डिसेंबर रोजी वृद्धापकाळानं निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. जॉन येवलेकर यांच्या पार्थिवावर सात रस्ता ख्रिश्चन स्मशानभुमीत बुधवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

जॉन येवलेकर यांनी सोलापूर आणि परिसरात तसेच महाराष्ट्रात मिमिक्रीचे कार्यक्रम केले. त्यांचे एकपात्री कार्यक्रम लोकप्रिय झाले होते. त्यांनी सोलापूरात ऑर्केस्ट्रा कार्यक्रमांना सुरुवात केली. ऑर्केस्ट्रामध्ये आपल्या बहारदार तसेच रसाळवाणीनं ते प्रेक्षकांत लोकप्रिय ठरले होते. काही वर्षापूर्वी सोलापूरात ठिकठिकाणी मेळे भरत यात जॉन येवलेकर यांचा एकपात्री कार्यक्रम निश्चित असे.

सोलापुरातील कलाक्षेत्रातील अनेक निवेदक त्यांच्यात तालमीत तयार झाले. पहिले ख्रिश्चन चर्च रंगभवनचे ते पंचवीस वर्ष सेक्रेटरी होते. सुशिलकुमार शिंदे यांचे निकटचे मित्र. जॉन येवलेकर हे काँग्रेस पक्षातही अनेकवर्ष कार्यरत होते. गेल्या काही वर्षापासून त्यांनी थेट कार्यक्रम बंद केले होते. मराठी, हिन्दीतील प्रसिध्द कलाकार सरला येवलेकर यांचे ते थोरले बंधू होत. बेगमपेठ येथील निवासस्थानी त्यांचा पार्थिव ठेवण्यात आला होता. यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील कलाकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी श्रद्धांजली वाहिली. जॉन येवलेकर यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली, जावई नातवंड असा परिवार  आहे.

Web Title: John Yevlekar, a veteran artist from Solapur, passed away