शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

जितेंद्र साठेंना बाजार समिती सभापती करा; शरद पवारांचा सुशीलकुमार शिंदे अन दिलीप मानेंना फोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 3:36 PM

सोलापूर बाजार समिती सभापतीपदासाठी मोर्चेबांधणी सुरू

ठळक मुद्दे माजी आमदार दिलीप माने यांनी १३ मे रोजी सभापतीपदाचा राजीनामा जिल्हाधिकाºयांकडे सादर केलानवीन निवडीसाठी जिल्हाधिकाºयांनी प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांची निवडणूक अधिकारी  म्हणून नियुक्ती केलीजगताप यांनी सोमवार दिनांक १० जून रोजी सभापतीपदाची निवडणूक जाहीर केली

सोलापूर: बाजार समितीच्या सभापतीपदासाठी सर्वच नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, पालकमंत्री विजयकुमार देशमुख हेही मैदानात उतरले आहेत. मंत्रीपदावर राहून सभापती होता येते का?, याची चाचपणी त्यांनी सुरू केली आहे. संख्याबळ नसताना अप्पू पाटीलही चेअरमन होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. बाळसाहेब शेळके यांना अगोदरच सभापती करायचे ठरले आहे असे सांगितले जात असताना जितेंद्र साठेही शर्यतीत  उतरले आहेत. यामुळे सोलापूर बाजार समितीचे सभापती होणार कोण?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 माजी आमदार दिलीप माने यांनी १३ मे रोजी सभापतीपदाचा राजीनामा जिल्हाधिकाºयांकडे सादर केला. त्यानंतर नवीन निवडीसाठी जिल्हाधिकाºयांनी प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांची निवडणूक अधिकारी  म्हणून नियुक्ती केली आहे. जगताप यांनी सोमवार दिनांक १० जून रोजी सभापतीपदाची निवडणूक जाहीर केली आहे.  निवड चार दिवसावर आली असताना इच्छुकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

राज्यमंत्रिमंडळात राज्यमंत्री व पालकमंत्री असलेले विजयकुमार देशमुख यांना सभापती होता येते का?, याची चौकशी स्वीय सहायकाने केली आहे. पणन अधिनियमाची कसलीही अडचण नसल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे पालकमंत्रीही इच्छुक असल्याचे दिसत आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या गटाचे दोनच संचालक आहेत. रामप्पा चिवडशेट्टी व अप्पू पाटील. दोन संचालक असताना अप्पू पाटील फोडाफोडीचे राजकारण करून सभापती होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

दिलीप माने यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सभापतीपदी कोण तर अगोदरच बाळासाहेब शेळके यांचे नाव निश्चित झाले असल्याचे सांगितले जात  आहे. सभापती निवडीसाठी आतापर्यंत संचालकांची  बैठक घेऊन नावाची चर्चा केली नसल्याचे सांगण्यात आले. शेळकेंचे नाव चर्चेत  असताना उत्तर सोलापूर तालुक्याला संधी मिळावी यासाठी जितेंद्र साठे प्रयत्नशील आहेत. याशिवाय दिलीप मानेही पुन्हा सभापती होतील असे सांगितले जात आहे. सध्याच्या या राजकीय परिस्थितीमुळे सोलापूर बाजार समितीचे सभापती होणार कोण?, याकडे लक्ष लागले आहे. 

शरद पवारांचा साठेंसाठी फोन- झेडपीचे विरोधी पक्ष नेते बळराम साठे यांनी राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून त्यांना बाजार समितीतील बलाबल समजावून सांगितले. त्यानंतर पवार यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी आमदार दिलीप माने यांना फोन करून जितेंद्र साठे यांना सभापती करण्याची सूचना केल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीElectionनिवडणूकSharad Pawarशरद पवारSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदे