पंढरपूरला निघालेली जीप झाडावर आदळली;  एक भाविक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 12:36 IST2019-05-15T12:35:00+5:302019-05-15T12:36:14+5:30

मोहिनी एकादशीदिवशीच बीडच्या भाविकावर काळाची झडप

Jeep on Pandharpur hit the tree; A devotee killed | पंढरपूरला निघालेली जीप झाडावर आदळली;  एक भाविक ठार

पंढरपूरला निघालेली जीप झाडावर आदळली;  एक भाविक ठार

ठळक मुद्दे- चालकाचा ताबा सुटल्याने झाडावर आदळली जीप- अपघातानंतर घटनास्थळी पोलीस अधिकारी दाखल- अपघातामधील जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू

पंढरपूर : शेरे (ता. आष्टी, जि. बीड) येथील भाविक बुधवारी एकादशी निमित्ताने पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी जीपमधून निघाले होते. पंढरपूर जवळील गुरसाळे येथे जीप झाडावर आदळली. या अपघातात लालाभाऊ धोंडीबा शिंदे या वृद्धांचा मृत्यू झाला.

बुधवारी मोहिनी एकादशी असल्यामुळे शेरे येथील ६ भाविक विठ्ठल रुक्मिणी माता दर्शनासाठी पंढरपूरला निघाले होते. त्यांची जीप पंढरपूर जवळील गुरसाळे जवळील शिंदे वस्ती येथे आली असता चालकाला डुलकी लागली. त्यामुळे चालकाचा जीपवरील ताबा सुटल्याने ती आदळली. या अपघातात लालाभाऊ धोंडीबा शिंदे (वय ६५) हे जागीच ठार झाले.

 

Web Title: Jeep on Pandharpur hit the tree; A devotee killed