पंढरपुरात थांबलेल्या ट्रकला जीपची धडक; कोल्हापूर जिल्ह्यातील चार जणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 09:28 AM2021-02-12T09:28:18+5:302021-02-12T09:32:47+5:30

Solapur Accident News : पंढरपूर - सांगोला रोडवर थांबलेल्या ट्रकला चारचाकी गाडीने धडक दिली. या अपघातात कोदाळी (ता. चंदगड, कोल्हापूर) येथील चार जणांचा जागीच मृत्यू झाला.

Jeep hit a truck parked at Pandharpur; Four persons died on the spot in Kolhapur district | पंढरपुरात थांबलेल्या ट्रकला जीपची धडक; कोल्हापूर जिल्ह्यातील चार जणांचा जागीच मृत्यू

पंढरपुरात थांबलेल्या ट्रकला जीपची धडक; कोल्हापूर जिल्ह्यातील चार जणांचा जागीच मृत्यू

Next

पंढरपूर : कासेगाव ( ता. पंढरपूर) येथील ७ वा मैल परिसरातील पंढरपूर - सांगोला रोडवर थांबलेल्या ट्रकला चारचाकी गाडीने धडक दिली. या अपघातात कोदाळी (ता. चंदगड, कोल्हापूर) येथील चार जणांचा जागीच मृत्यू झालाची घटना शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली. 

जी जे ०३ डबल्यू ९३५५ या क्रमांकाची ट्रक गुजरातवरून येत होती. यावेळी चंदगड ( कोल्हापूर) येथून येणारे के ए ०४ एम बी ९४७६ या क्रमांकाची गाडी त्यांना धडकली. यामध्ये १ पुरुष, २ महिला, १ लहान मुलगी असे ४  जण जागीच मयत झाले. १ पुरुष गंभीर जखमी झाला आहे. ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ खरात यांनी घटनास्थळी भेट दिली.

यावेळी एका मयताचे नाव  धोंडीराम सखाराम धनगर (रा. कोदाळी, ता. चंदगड, कोल्हापूर) असे आहे. इतर मयत व जखमींची ओळख शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत. अपघातातील मयत व जखमी लोकांना उपजिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले असल्याचे पो नि. किरण अवचर यांनी सांगितले. 

Web Title: Jeep hit a truck parked at Pandharpur; Four persons died on the spot in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.