शिवसेना आणि वाझेंचे संबंध जोडणे चुकीचे; हळू हळू कळेल जबाबदार कोण : जयंत पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 10:31 IST2021-03-21T10:31:01+5:302021-03-21T10:31:48+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

It is wrong to link Shiv Sena and Waze; Gradually we will know who is responsible: Jayant Patil | शिवसेना आणि वाझेंचे संबंध जोडणे चुकीचे; हळू हळू कळेल जबाबदार कोण : जयंत पाटील 

शिवसेना आणि वाझेंचे संबंध जोडणे चुकीचे; हळू हळू कळेल जबाबदार कोण : जयंत पाटील 

पंढरपूर : शिवसेना आणि वाझेंचे संबंध जोडणे चुकीचे आहे. वाझेंना शिवसेनेशी चिटकवण्याचा प्रयत्न कोणी करू नये. वाझेंना आल्या आल्या जबाबदारी कोणी दिली, हे हळू हळू कळेल असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

पंढरपूर - मंगळवेढा मतदार संघाच्या पोटनिवडणुकी विषयी चर्चा करण्यासाठी जयंत पाटील पंढरपुरला आले होते. बैठक सुरू होण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पुढे पाटील म्हणाले, कोणाला तरी खुश करण्यासाठी परमबीर सिंगाचा लेटर बॉंब आहे. १७ वर्षांनंतर परमबीर यांच्या सहीनेच मोठ्या प्रकरणाचे तपास वाझेंकडे देण्यात आले आहेत. अंबानी याच्या घराजवळ  ठेवण्यात आलेल्या स्फोटके प्रकरणात जबाबदार कोण आहे. हे शोधण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनामा घेणार नाही. गृहमंत्रीपदी अनिल देशमुखच राहतील असे जयंत पाटील यांनी सांगितले.

Web Title: It is wrong to link Shiv Sena and Waze; Gradually we will know who is responsible: Jayant Patil